शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

डीआरएम चॅलेंज क्रिकेट

By admin | Updated: January 30, 2015 00:54 IST

मध्य रेल्वे डीआरएम चॅलेंज क्रिकेट

मध्य रेल्वे डीआरएम चॅलेंज क्रिकेट
एसक्यूटी संघाला डीआरएम चषक
नागपूर : एसक्यूटी संघाने कमर्शियल संघाला दहा गड्यांनी सहज पराभूत करीत २० व्या मध्य रेल्वे डीआरएम चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अजनी मैदानावर गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात एसक्यूटीने कमर्शियलला २० षटकांत ८ बाद ११२ धावांत रोखल्यानंतर एकही गडी न गमावता लक्ष्य सहज गाठले. नितीन अहिरराव याने दोन षटकार आणि आठ चौकारांसह ६७ धावा केल्या. राहुल जाधव याने ३७ धावांचे योगदान दिले. अहिरराव सामनावीर ठरला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य पाहुणे डीआरएम ओ. पी. सिंग हे होते. यावेळी क्रीडा अधिकारी गौतम जैन, सुखविंदर सिद्धू, मनोज कुमार, के. फारुकी, हबीब खान, विनोद चतुर्वेदी, नितीन समर्थ , दीपक वझलवार, प्रबोधन जनबंधू, प्रशांत कानतोडे, प्रवीण लोंढासे आदी उपस्थित होते. विजेत्या संघाला २१ हजार रोख व चषक आणि उपविजेत्या संघाला १५ हजार रोख व चषक देण्यात आला.
स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज विनय यादव, गोलंदाज जे. भगत, अष्टपैलू खेळाडू सुधीर पेंदाम, क्षेत्ररक्षक भारत चंदेल, यष्टिरक्षक आणि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू राहुल जाधव यांना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.(क्रीडा प्रतिनिधी)
.......................................................
नॅशनल गेम्ससाठी पाच हॅण्डबॉलपटूंची निवड
नागपूर : केरळमध्ये आगामी ३१ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या नॅशनल गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला हॅण्डबॉल संघात नागपूरच्या पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्राजक्ता भगत, पुनम कडव, प्राची खराबे, मेघा शेंडे आणि समीक्षा इटनकर यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडू फ्रेन्ड्स क्लबच्या सदस्य असून दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त सीताराम भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात यशवंत स्टेडियम येथे सराव करतात.(क्रीडा प्रतिनिधी)
.......................................................