शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कन्या जीवासोबत मौजमस्तीत रंगला धोनी

By admin | Updated: February 16, 2017 00:08 IST

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कन्या जीवासोबत सध्या चर्चेत आहे. कसोटीतून निवृत्त झालेल्या माहीने फावल्या वेळेचा

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कन्या जीवासोबत सध्या चर्चेत आहे. कसोटीतून निवृत्त झालेल्या माहीने फावल्या वेळेचा सदुपयोग करीत जीवासोबत आनंदाचे क्षण घालविण्याचा निर्णय घेतला. माही, पत्नी साक्षी आणि कन्या जीवा सध्या निवांत आहेत. सोशल मीडियावर या तिघांची अनेक छायाचित्रे पोस्ट करण्यात आली.धोनी आणि पत्नी साक्षी यांनी कन्या जीवाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मसुरी गाठले. माहीने जीवासोबत खूप एन्जॉय केले. त्याने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला.त्यात तो जमिनीवर सैनिकासारखा व्यायाम करताना दिसत आहे. सेनेप्रति धोनीचे प्रेम आणि सन्मान जगजाहीर आहे. २०११ मध्ये भारतीय सैन्यदलात धोनीने ट्रेनिंग केले. त्याला लेफ्टनंट कर्नलचे मानद पद बहाल करण्यात आले होते. धोनी मसुरीत मुलीसोबत आर्मीगेम खेळत असल्याचे या छायाचित्रात दिसत आहे.कसोटीतून निवृत्त झाल्यापासून आधीच्या तुलनेत माही कुटुंबाला अधिक वेळ देतो. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी जीवाचा जन्म झाला. त्यावेळी माही आॅस्ट्रेलियात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यात व्यस्त होता. भारताला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर तो भारतात परतला.धोनी आता देशासाठी ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसेल. याशिवाय आयपीएलच्या दहाव्या पर्वातही तो रायझिंग पुणे सुपरजायन्टस्चे नेतृत्व करताना दिसणार आहे. (वृत्तसंस्था)