शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

हा तर द्रविड, झहीरचा अपमान

By admin | Updated: July 17, 2017 00:42 IST

राहुल द्रविड व झहीर खान यांची नियुक्ती रोखून त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात येत आहे, असे मत प्रशासकांच्या समितीचे

नवी दिल्ली : राहुल द्रविड व झहीर खान यांची नियुक्ती रोखून त्यांचा सार्वजनिक अपमान करण्यात येत आहे, असे मत प्रशासकांच्या समितीचे (सीओए) माजी सदस्य रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केले. गुहा यांनी टिष्ट्वट केले, ‘अनिल कुंबळे यांच्यासोबत लाजीरवाणे वर्तन आणि झहीर व राहुल द्रविड यांच्याबाबतची भूमिका बघता समितीची नीती चुकीची भासते. कुंबळे, द्रविड व झहीर हे महान खेळाडू आहेत. त्यांनी मैदानावर सर्वस्व झोकून दिलेले आहे. त्यांचा सार्वजनिक अपमान होणे चुकीचे आहे.’ सीओएने शनिवारी रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीला मंजुरी दिली. त्यानंतर गुहा यांनी हे वक्तव्य केले. समितीला अद्याप द्रविड व झहीर विदेश दौऱ्यासाठी अनुक्रमे फलंदाजी व गोलंदाजी सल्लागार आहेत किंवा नाही, हे स्पष्ट करता आलेले नाही. बीसीसीआयने सुरुवातीला तसा दावा केला होता. बैठकीच्या अहवालानुसार अन्य सल्लागारांच्या नियुक्तीबाबतचा निर्णय समिती मुख्य प्रशिक्षकासोबत चर्चा केल्यानंतर करणार आहे. गुहा यांनी भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार संस्कृतीवर टीका करताना प्रशासकांच्या समितीमधून राजीनामा दिला होता. त्यांनी माजी खेळाडूंच्या दुटप्पी भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. (वृत्तसंस्था)कुंबळेंच्या तुलनेत शास्त्री यांना कमी वेतननवी दिल्ली : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे वेतन चार सदस्यांची समिती निश्चित करणार आहे, पण नवनियुक्त प्रशिक्षकाला वेतन म्हणून वार्षिक ७ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी प्रशिक्षक कुंबळे यांच्या तुलनेत ही रक्कम दोन कोटी रुपयांनी कमी आहे. शास्त्री यांचे वेतन निश्चित करण्यासाठी बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना, काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी, सीईओ राहुल जोहरी व प्रशासकीय समितीतील डायना एडलजी या चार सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. शास्त्री यांना मिळणारे वेतन (७ कोटी रुपये) ‘अ’ दर्जा असलेल्या खेळाडूच्या वार्षिक मानधनाच्या बरोबरीचे आहे. (वृत्तसंस्था)