शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

हिृशा दुबेची दुहेरी आगेकूच

By admin | Updated: July 28, 2016 00:24 IST

हिृशा दुबे या क्रिकेट क्लब ओफ इंडिया (सीसीआय) संघाच्या खेळाडूने बृहन्मुंबई जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपला दबदबा राखताना मुलींच्या १५ व १३ वर्षांखालील

मुंबई : हिृशा दुबे या क्रिकेट क्लब ओफ इंडिया (सीसीआय) संघाच्या खेळाडूने बृहन्मुंबई जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आपला दबदबा राखताना मुलींच्या १५ व १३ वर्षांखालील गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी पुजा काचरे, रुद्रा राणे यांनीही १५ वर्षांखालील गटातून आगेकूच केली.हिृशाने जबरदस्त वर्चस्व राखताना १५ वर्षांखालील गटात एकहाती वर्चस्व राखताना साची जुकरचा २१-५, २१-१३ असा धुव्वा उडवला. हिृशाच्या धडाक्यापुढे साचीचा काहीच निभाव लागला नाही. तीच्या आक्रमकतेपुढे साचीने सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्नही सोडून दिले. त्याच वेळी पुजाने साक्षी शेटेला २१-७, २१-११ असे नमवूण उपांत्य फेरी गाठली, तर रद्राने खुशी कुमारीला २१-१३, २१-१० असा धक्का देत आगेकूच केली.मुलींच्या १३ वर्षांखालील गटातही हिृशाने आपला दबदबा राखला. सुरुवातीपासूनच तुफानी खेळ करताना हिृशाने जान्हवी महालेचा २१-१, २१-७ असा फडशा पाडताना दिमाखात उपांत्य फेरी गाठली, तर १५ वर्षांखालील गटात अपयशी ठरलेल्या साचीने सान्वी मार्डोलकरला २१-६, २१-८ असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. खुशीनेदेखील उपांत्य फेरीत प्रवेश करताना गौरी वैश्यंपायनचे आव्हान २१-१३, २१-७ असे संपुष्टात आणले, तर अन्य सामन्यात तारिनी सुरीने उत्कर्ष सिन्हाचे आव्हान २१-८, २१-१० असे परतावून उपांत्य फेरीतील जागा निश्चित केली. (क्रीडा प्रतिनिधी)