शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
2
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
3
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
4
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
5
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
6
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
7
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
8
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
9
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
10
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
11
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
12
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
13
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
14
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
15
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
16
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
17
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
18
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
19
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
20
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट

डोपिंगमध्ये दोषी खेळाडू, कोचेसना कोठडीची शिक्षा!

By admin | Updated: April 28, 2017 02:08 IST

डोपिंगचा ‘डंख’ भारतीय क्रीडा विश्वात हळूहळू चांगलाच पोखरू लागला आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी डोपिंग ‘गुन्हेगारी’ श्रेणीत

नवी दिल्ली : डोपिंगचा ‘डंख’ भारतीय क्रीडा विश्वात हळूहळू चांगलाच पोखरू लागला आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी डोपिंग ‘गुन्हेगारी’ श्रेणीत आणणे तसेच दोषी खेळाडू आणि कोचेसना थेट कारागृहात पाठविण्याचा सर्वसंमत कायदा करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी जर्मनी आणि आॅस्ट्रेलियातील सध्याच्या कायद्याचा अभ्यास करण्यात येईल.केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी काही दिवसांपूर्वी डोपिंगमधील दोषींना थेट कारागृहात पाठविण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी केली होती. शालेय आणि विद्यापीठस्तरावर डोपिंंगचे प्रमाण अधिक असल्याने या खेळाडूंना भीती वाटावी, असा कडक कायदा अस्तित्वात आणला जात आहे. डोपिंगविरोधी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गोयल म्हणाले, ‘डोपिंगला गुन्हे श्रेणीत आणून दोषींना कोठडीची शिक्षा देण्याचा विचार आहे.’ राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीचे(नाडा) महासंचालक नवीन अग्रवाल हे या वेळी उपस्थित होते.गोयल म्हणाले, ‘‘आधी राष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मर्यादित असलेले डोपिंग आता शाळा तसेच विद्यापीठस्तरावरील स्पर्धेपर्यंत पोहोचले आहे. याला आळा बसण्यासाठी दोषी खेळाडूसोबतच कोच, ट्रेनर आणि डॉक्टर हेदेखील दोषी ठरू शकतील. याविषयी ताबडतोब अटकेचीदेखील तरतूद असेल. अनेकदा खेळाडू अनवधानाने द्रव घेतात. कोचेसच्या चुकीचा फटका खेळाडूला बसतो. कोचेस मात्र अलिप्त राहतात. नव्या कायद्यात सर्वांना दोषी मानले जाईल. मसुदा तयार करताना विधी मंत्रालय, सीबीआय आणि अमलीद्रव्यविरोधी विभागाचे मत विचारात घेतले जाणार आहे.’’सन २०१५च्या वाडाच्या अहवालात डोपिंगमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर होता. ११७ भारतीय खेळाडूंना शिक्षा देण्यात आली. सर्वाधिक प्रकरणे रशिया आणि इटलीत घडली. दरवर्षी भारतात सात हजार चाचण्या होत असून, कोचेसनी खेळाडूंना मूर्ख बनवू नये, हा आमचा हेतू असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)