शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंगमध्ये दोषी वेटलिफ्टरने जिंकले विश्वविक्रमी सुवर्ण!

By admin | Updated: August 12, 2016 03:19 IST

२००८ ते २०१२ या कालावधीत सातत्याने होत असलेल्या डोपिंगच्या आरोपांमुळे पाच आॅलिम्पिक पदके गमविणाऱ्या कझाखिस्तानसाठी राहीमोव या खेळाडूने रिओ आॅलिम्पिकमध्ये

रिओ : २००८ ते २०१२ या कालावधीत सातत्याने होत असलेल्या डोपिंगच्या आरोपांमुळे पाच आॅलिम्पिक पदके गमविणाऱ्या कझाखिस्तानसाठी राहीमोव या खेळाडूने रिओ आॅलिम्पिकमध्ये ‘क्लीन अ‍ॅन्ड जर्क’चा विश्वविक्रम मोडीत काढून ७७ किलो वजन गटात सुवर्ण पदक जिंकले. यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये कझाखचे हे पहिले पदक ठरले.राहीमोव हा सुवर्ण जिंकणारा खेळाडू म्हणून जितका चर्चेत नसेल त्यापेक्षा त्याची अधिक प्रसिद्धी २०१३ साली डोपिंमध्ये अडकलेला वेटलिफ्टर अशी आहे. यामुळे त्याला दोन वर्षे बंदीची शिक्षा भोगावी लागली. डोपिंगचा आरोपी राहिलेल्या राहीमोवला रिओत क्लीन अ‍ॅन्ड जर्क जिंकण्यासाठी २१४ किलो वजन उचलायचे होते. त्याची टक्कर चीनचा लू याच्याविरुद्ध होती. दोन्ही खेळाडूंनी ३७९ किलो वजन उचलले. पण राहीमोव शरीराने हलका असल्यामुळे त्याला सुवर्ण बहाल करण्यात आले. लू याला रौप्यावर समाधान मानावे लागले. कझाखचा खेळाडू विजयी होताच संघाचे राष्ट्रीय कोच अ‍ॅलेक्स यांनी थेट प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली. त्यांनी देशाचा झेंडा देखील फडकविला. विशेष असे की अ‍ॅलेक्स हे २००८ मध्ये आॅलिम्पिक कोच बनल्यापासून कझाखिस्तानची ३२ डोप प्रकरणे पुढे आली आहेत. २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये या देशाचे चार चॅम्पियन तसेच बीजिंग आॅलिम्पिकमध्ये एक चॅम्पियन डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला होता. प्रामाणिकपणाविषयी प्रश्न विचारताच तो म्हणाला, ‘असा प्रश्न का उपस्थित होत आहे, हे मला माहिती नाही.