शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

डॉन ब्रॅडमन यांचा हा विक्रम विराट कोहली मोडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 22:21 IST

आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर सध्या रनमशीन बनलेल्या विराट कोहलीला आता ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम खुणावत आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १९ : आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर सध्या रनमशीन बनलेल्या विराट कोहलीला आता ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम खुणावत आहे. आयपीएलच्या नवव्या मोसमात कोहली आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून, याआधीच त्याने स्पर्धेत एकाच मोसमात सर्वाधिक धावांचा ख्रिस गेल व मायकल हसी यांचा विक्रम मोडला आहे. या दोघांनी प्रत्येकी ७३३ धावा काढल्या होत्या. या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर कोहलीचा प्रयत्न ब्रॅडमन यांच्या विक्रमाला मागे टाकण्याचा असेल. १९३० साली झालेल्या अ‍ॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ९७४ धावा चोपल्या होत्या. ब्रॅडमन यांनी त्यावेळी पाच सामन्यांत १३९.१४ च्या जबरदस्त सरासरीच्या जोरावर चार शतके झळकावली होती. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा विचार केल्यास आॅस्टे्रलियाच्या ग्रेग चॅपल यांनी १९८१-८२ साली बेन्सन अ‍ॅण्ड हेजेस वर्ल्ड सिरीजमध्ये १४ सामन्यांतून ६८.८०च्या सरासरीने ८६८ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक व ५ अर्धशतकांचा समावेश आहे.एकूणच, सध्याचा कोहलीचा फॉर्म पाहता तो ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर नक्कीच आहे. त्याने १३ सामन्यांतून ८६.५०च्या सरासरीने ८६५ धावा कुटल्या असून, यामध्ये विक्रमी चार शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अजून कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा एक साखळी सामना शिल्लक असून, जर बँगलोरने प्ले आॅफमध्ये प्रवेश केला, तर कोहली नक्कीच ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकू शकतो.