शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गावस्कर ‘आयसीसी’वर भडकले स्मिथच्या ‘त्या’ कृतीकडे डोळेझाक का?

By admin | Updated: March 10, 2017 06:25 IST

बंगळुरू कसोटीत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने केलेल्या चुकीवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर

नवी दिल्ली : बंगळुरू कसोटीत आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने केलेल्या चुकीवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टीका केली. एखाद्या देशाला झुकते माप दिले जाते आणि दुसऱ्या देशाला वाऱ्यावर सोडले जाते, अशी भूमिका योग्य नाही, या शब्दांत गावस्कर यांनी आयसीसीला धारेवर धरले. एनडी टीव्ही या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘भविष्यात स्मिथने केलेली चूक समजा एखाद्या भारतीय खेळाडूकडून झाली, तर मग त्याच्यावरही कारवाई होऊ नये. तिसऱ्या कसोटीत समजा विराट कोहलीला बाद देण्यात आले, तर त्यानेदेखील डीआरएस मागण्याआधी ड्रेसिंग रुमकडे पाहायला हवे. कोहलीच्या या भूमिकेवर आयसीसी आणि मॅच रेफ्री काय कारवाई करतील, हेच मला पाहायचे आहे.’या घटनेवर वाद उद्भवताच बीसीसीआय आणि आॅस्ट्रेलिया बोर्डाने आपापल्या कर्णधारांची बाजू घेतली होती. आयसीसीने मात्र काल उशिरा रात्री स्मिथ आणि कोहली यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करायची नाही, असा निर्णय घेतला. गावस्कर म्हणाले, ‘आयसीसी मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांना स्मिथच्या इशारा मागण्यात काहीही वावगे आढळले नाही. स्मिथने आयसीसी आचारसंहितेचे धडधडीत उल्लंघन केल्यानंतर ब्रॉड यांना काहीच दिसले नाही, याचे मला आश्चर्य वाटते.’पंचांनीही स्मिथने केलेली कृती योग्य नसल्याचे म्हटले होते. सामन्यानंतर खुद्द स्मिथनेही झालेली चूक मान्य केली होती. स्मिथच्या कृतीवर आयसीसीकडून कारवाई केली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, आयसीसीने स्मिथवर कोणतीच कारवाई केली नाही. (वृत्तसंस्था)