शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विजयी सांगतेसाठी जोकोविच; मरे उत्सुक

By admin | Updated: November 13, 2016 02:31 IST

नुकतेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेला ब्रिटनचा अ‍ॅँडी मरे व सर्बियाचा नोवाक जोकोविच एटीपी टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकून या वर्षाच्या शेवटच्या सत्राची विजयी

लंडन : नुकतेच जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेला ब्रिटनचा अ‍ॅँडी मरे व सर्बियाचा नोवाक जोकोविच एटीपी टूर फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकून या वर्षाच्या शेवटच्या सत्राची विजयी सांगता करण्यासाठी उत्सुक असणार आहेत. ही स्पर्धा जिंकून अव्वल स्थानावर राहण्यासाठी दोघांचीही चढाओढ असणार आहे.मरे व जोकोविच हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. जोकोविचने या वर्षी आॅस्ट्रेलिया ओपन स्पर्धा जिंकून विजयी सुरुवात केली होती, तर मरेने विम्बल्डन व आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. या दोघांमध्ये १५ वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मरे याने पॅरिस मास्टर्स स्पर्धा जिंकून जोकोविच याच्याकडे १२२ आठवड्यांपासून असलेले नंबर वनचे पद काढून घेतले आहे. मरे अव्वल क्रमांकावर असला तरी तो जोकोविचपेक्षा ४०५ गुणांनीच पुढे आहे. जर मरे या स्पर्धेत जोकोविचपेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही, तर पुन्हा जोकोविच अव्वल स्थानी विराजमान होणार आहे.आठ खेळाडूंचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत मरे व जोकोविच यांना वेगवेगळ्या गटांत स्थान मिळाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत या दोघांमध्ये सामना होणार नाही. ही स्पर्धा जिंकून नंबर वनचे स्थान पटकावण्यासाठी दोघे प्रयत्नशील आहेत. जोकोने चार वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. रॉजर फेडरर व राफेल नदाल यांच्या अनुपस्थितीत या दोन खेळाडूंची लढत रोमांचक असणार आहे. (वृत्तसंस्था)