शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: June 29, 2016 23:17 IST

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने बुधवारी फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मॅनारिनो याचा ६-४, ६-३, ७-६ असा सलग सेटमध्ये पराभव करताना

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. २९ : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि गत चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने बुधवारी फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मॅनारिनो याचा ६-४, ६-३, ७-६ असा सलग सेटमध्ये पराभव करताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली.पावसामुळे सेंटर कोर्टमध्ये झाकलेल्या छताखाली जोकोविच आणि मॅनारिनो यांचा सामना झाला. चौथ्यांदा विम्बल्डन जिंकण्यासाठी उतरलेल्या जोकोविचने दोन तास ४ मिनिटांत आपली लढत जिंकली.यावर्षी आॅस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविणाऱ्या २९ वर्षीय जोकोविचने पहिला सेट ६-४ ने जिंकला आणि दुसरा सेट ६-३ ने आपल्या नावावर केला. त्यानंतर २८ वर्षी मॅनारिनो याने तिसऱ्या सेटमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. जोकोविचसाठी विजयाचा मार्ग खडतर केला; परंतु जोकोविचने जबरदस्त खेळ करताना टायब्रेकमध्ये हा गेम ७-५ असा जिंकताना तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.त्याआधी तृतीय मानांकित पोलंडच्या एग्निस्जका रदवांस्का आणि दहाव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डिच यांनी आपापल्या लढती जिंकताना दुसरी फेरी गाठली. रदवांस्काने युक्रेनच्या कॅटरिना कोल्जोवा याला पावसाचा अडथळा आलेल्या सामन्यात ६३ मिनिटांत ६-२, ६-१ असे पराभूत केले. बेर्डिचने क्रोएशियाच्या इव्हान डोडिग याचे कडवे आव्हान ७-६, ५-७, ६-१, ७-६ असे मोडीत काढले. बेर्डिचला डोडिगविरुद्ध पहिली फेरी जिंकण्यासाठी तीन तास २४ मिनिटे संघर्ष करावा लागला.बेर्डिचने पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-५ आणि चौथा सेट टायब्रेकरमध्ये ७-२ असा जिंकला. बेर्डिचची दुसऱ्या फेरीतील लढत जर्मनीच्या बेंजामिन बेकर याच्याशी होईल. बेकर याने काल अर्जेंटिनाच्या फाकुंडो बाग्निस याचा ६-३, ६-३, ६-१ असा सलग सेटमध्ये पराभव केला.स्पर्धेच्या दिवशी पावसाचा अडथळा आला. त्यामुळे सामने थांबवावे लागले. पाऊस येण्याआधी झालेल्या अन्य दोन सामन्यांत जर्मनीच्या आंद्रिया पेत्कोविचने जपानच्या नाओ हिबिनो याचा ३-६, ७-५, ६-२ आणि रशियाच्या एवेगेनिया रोडिना याने युक्रेनच्या लिसिया सुरेंको याचा ६-३, ७-५ असा पराभव केला.