शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच, सेरेनाचा धमाकेदार खेळ

By admin | Updated: August 30, 2014 04:06 IST

यूएस ओपन : अ‍ॅँडी मरेकडून मॅथियास बाकिंगर पराभूत

न्यूयॉर्क : टॉप सीडेड नोव्हाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील आपापले सामने जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने फ्रान्सच्या पॉल हेन्री मॅथ्यू याला ६-१, ६-३, ६-0 असे एकतर्फी हरवून दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला. महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला आपल्याच देशाच्या वानिया किंग याला सलग सेटमध्ये ६-१, ६-0 असे हरविण्यास फारसे कष्ट पडले नाहीत.पुरुष गटात अन्य सामन्यात आठवे मानांकनप्राप्त आणि माजी विजेता ब्रिटनच्या अँडी मरे याने जर्मनीच्या मॅथियास बाकिंगर याला पराभूत केले. प्रेक्षकांचा अत्यंत कमी प्रतिसाद लाभलेल्या या सामन्यात मरेने ६-३, ६-३, ६-४ असे सहज हरविले. त्याच्याशिवाय विल्फ्रेड त्सोंगा, मिलोस राओनिक आणि के केई निशिकोरी यांनीही पुरुष एकेरीचे दुसऱ्या फेरीचे सामने जिंकले आहेत. महिला एकेरीच्या अन्य सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हाने अपेक्षेनुरूप कामगिरी करताना तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. दुसऱ्या फेरीतील सामन्यात तिने आपल्याच देशाच्या पेत्रा सेटोवस्काचे आव्हान ६-४, ६-२ असे निपटून काढले. सातव्या मानांकनप्राप्त कॅनडाच्या इयुजिनी बुकार्डने सलग चौथ्या ग्रँड स्लॅमच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार कूच करीत रोमानियाच्या सोराना कर्स्टिया हिला ६-२, ६-७, ६-४ असे हरविले. बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने अमेरिकेच्या ख्रिस्तिना मॅकहेल हिला ६-३, ६-२ असे हरविले. सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोविक हिने आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्तोसूर हिला हरविले.या स्पर्धेत अँडी मरे यासारख्या वरिष्ठ खेळाडूच्या सामन्याला खुर्च्या ओस पडल्या होत्या; पण अमेरिकेची उगवती टेनिस स्टार १५ वर्षीय बेलिसचा सामना पाहण्यास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. स्टेडियमच्या आत आणि बाहेर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनसमोरही गर्दी दिसत होती; परंतु गेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियन ओपनची उपविजेती डोमनिका सिबुलकोव्हा हिला पराभूत करणारी बेलिस आज आपला करिष्मा दाखवू शकली नाही. कझाकिस्तानच्या झरिना डियासने संघर्षपूर्ण सामन्यात ६-३, 0-६, ६-२ असा बेलिसचा पराभव केला. (वृत्तसंस्था)