शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविच, फेडरर कोट्यधीशाच्या ‘कोर्टात’

By admin | Updated: December 27, 2015 02:32 IST

नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर २०१६ मध्ये टेनिस इतिहासात १० कोटी डॉलरची कमाई करणारे पहिले पुरुष टेनिसपटू ठरू शकतात.

पॅरिस : नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर २०१६ मध्ये टेनिस इतिहासात १० कोटी डॉलरची कमाई करणारे पहिले पुरुष टेनिसपटू ठरू शकतात.टेनिस इतिहासात कोणताही खेळाडू कोर्टपासून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधी १० कोटी डॉलरच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही; परंतु जागतिक क्रमवारीतील नंबर वन जोकोविच आणि तृतीय मानांकित फेडरर या वर्षी ही किमया साधू शकतात. आतापर्यंत २८ वर्षीय जोकोविचची बक्षिसाची रक्कम ९ कोटी ४० लाख डॉलरपेक्षा जास्त आहे, तर त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी सिनियर असणाऱ्या फेडररच्या नावावर ९ कोटी ७३ लाख बक्षिसाची रक्कम आहे.जानेवारीत वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम आॅस्ट्रेलिया ओपनच्या विजेत्यास ३८ लाख ५० हजार डॉलर रक्कम मिळणार आहे आणि फेडररने जर ही स्पर्धा जिंकली, तर तो १० कोटी डॉलरचा आकडा गाठेल.एका वर्षात सर्वाधिक उत्पन्न मिळवण्याचा विक्रम जोकोविचच्या नावावर आहे. त्याने २०१५मध्ये बक्षिसाच्या रकमेद्वारे १.२५ कोटींची कमाई केली होती आणि त्यादरम्यान चारपैकी ३ ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले होते.जोकोविच म्हणाला, ‘‘हे वर्ष माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. त्यामुळे पुढे जाण्यासाठी मला प्रेरणा मिळाली आहे आणि पुढील वर्षीही शानदार कामगिरी करेन, अशी मला आशा आहे.’’ फोर्ब्सच्या यादीनुसार फेडरर या वर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)