शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

दिव्यांग आर्चर : उपेक्षा आणि अडचणींवर मात करीत गाजविले मैदान, त्यांच्या जिद्दीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:24 IST

संदीप गवई आणि अभिषेक ठवरे. धनुर्विद्येत पारंगत असलेले हे दिव्यांग खेळाडू देशाची मान उंचावत आहेत. दोघांनाही आर्थिक पाठबळ नसले तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याची जिद्द मात्र काायम आहे.

- किशोर बागडेनागपूर: संदीप गवई आणि अभिषेक ठवरे. धनुर्विद्येत पारंगत असलेले हे दिव्यांग खेळाडू देशाची मान उंचावत आहेत. दोघांनाही आर्थिक पाठबळ नसले तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याची जिद्द मात्र काायम आहे.मैदानावर भरारी घेण्यासाठी दोघांनीही सर्वस्व पणाला लावले आहे. क्रीडा संस्कृती रुजविण्याचे, खेळाचे हित साधण्याचे गाजर दाखविले जात असले तरी खेळाडूंचे कल्याण होईल, असे प्रयत्न होताना दिसत नाहीत. दुर्लक्षित असले तरी खेळातून स्वत:ची ओळख निर्माण करण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या याखेळाडूंकडे शासन व समाजाचे लक्ष का जात नाही, हाच खरा प्रश्न आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंच्या किमान अपेक्षा, वास्तव आणि गरजा समजून घेणे गरजेचे आहे.अभिषेक, भारताचा पहिला टीथ आर्चर आईचे दागिने गहाण ठेवून जुना आर्चरी सेट विकत घेणारा अभिकेष जन्मापासून पोलिओग्रस्त. जिद्द त्याच्यारक्तात भिनलेली. आई खासगी दवाखान्यात स्वयंपाकीण तर वडील ट्रान्सपोर्टमध्ये खासगी कर्मचारी. राहायला छोटखानी घर. सुरुवातीला अभिषेक अ‍ॅथ्लेटिक्समध्ये गेला. तेथे मैदान गाजविल्यानंतर २०१४ पासून आर्चरीकडे वळला. महागडे साहित्य खरेदीसाठी पैसे नव्हते. आईने मुलाची तळमळ ओळखली. अभिषेकने आईच्या मंगळसूत्र गहाणातून आलेल्या पैशाने आर्चरीच्या साहित्याची खरेदी केल्यानंतर अनेक स्पर्धा गाजविल्या. तो दाताने धनुर्विधा करणारा देशातील पहिला आर्चर ठरला. टीव्हीवरील अनेक रिअ‍ॅलिटी शोमधून झळकत असल्याने देशभर ओळख झाली.अमेरिकेच्या मूळनिवासी संस्थेने तिथल्या टीव्हीसाठी त्याचा कारनामा रेकॉर्ड केला. अभिषेकने स्पर्धात्मक पातळीवर आंतर विद्यापीठ स्तरावरदेखील पदक जिंकले आहे.सध्या तो रोहतकच्या साई केंद्रात भारतीय संघाच्या शिबिरात व्यस्त आहे. याच खेळात चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारा एका पायाने दिव्यांग संदीप गवई हा देखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत २००९ पासून घाम गाळत आहे. तो देखील साई केंद्रात भारतीय संघ निवडचाचणीसाठी गेला आहे. खेळासाठी पैशाची तजवीज करण्यासाठी संदीप कार्यक्रमात फेटे बांधतो. त्यातून आलेली बिदागी तो खेळासाठी वापरतो. थायलंडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने कांस्य पदक जिंकले.संदीपच्या आंतरराष्ट्रीय कर्तृवाचा गौरव म्हणून राज्य शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला. आर्चरीसारख्या महागड्या खेळात वर्षाला किमान १२  बो  लागतात. एक डझन बो साठी ३६ हजार मोजावे लागतात. घरच्यांचा सांभाळ करून इतकी रक्कम खेळावर खर्च करण्याची ताकद नसली तरीहे दोन्ही अपंग खेळाडू जीवापाड मेहनत करीत खेळासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत. अभिषेकच्या मदतीला दुसरा शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू विपिन इटनकर धावला. त्याने ५० हजार रुपये दिल्यामुळे अभिषेक आज भारतीय संघाच्या शिबिरात सहभागी होऊ शकला.दोघांनाही अपंग कोट्यात नोकरी मिळविण्यासाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

किमान सरावाचा खर्च मिळावा...दोघांचीही माफक अपेक्षा आहे, ती म्हणजे किमान सरावावर होणारा खर्च सरकारने द्यावा. हरियाणा सरकार आपल्या खेळाडूंना नोकरी तर देतेच पण सरावासाठी दरवर्षी किमान दोन लाख रुपयाची मदत करते. महाराष्टÑात असे काही प्रोत्साहन मिळत नाही. आॅलिम्पिक खेळ असलेल्याआर्चरीत देशाला पदके मिळण्याची शक्यता असूनही राज्य सरकार आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूंना कुठलेही आर्थिकपाठबळ देत नाही. कुठलेही प्रायोजक नसताना आम्ही आंतरराष्ट्रीय पातळी गाठली तरीही उपेक्षा कायम आहे.राज्याबाहेर आमचे फार कौतुक होते पण आपल्याच राज्यात सराव आणि स्पर्धेसाठी कुठेलेही आर्थिक पाठबळ मिळत नाही, असे अभिषेक म्हणाला. राज्यकर्त्यांकडूनही कमालीची उदासिनता बाळगली जात असल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.