शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

दिंडा ठरला सर्वांत ‘महागडा’ गोलंदाज

By admin | Updated: April 8, 2017 05:48 IST

‘आयपीएल’च्या दहाव्या सत्रात विजयी सलामी दिलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला नमवले.

पुणे : ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्रात विजयी सलामी दिलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने बलाढ्य मुंबई इंडियन्सला नमवले. मात्र, हा सामना पुण्याच्या अशोद दिंडासाठी खूप कठीण गेला. विशेष म्हणजे डावातील अखेरच्या षटकात ३० धावांची खैरात केलेला दिंडा आतापर्यंतचा सर्वांत महागडा गोलंदाज ठरला. त्यात दखल घेण्याची बाब म्हणजे डावातील अखेरच्या अव्वल ५ महागड्या षटकांपैकी ३ षटके दिंडाने टाकली आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला ७ विकेट्सने नमविले. मात्र, या सामन्यात दिंडाने पहिल्या डावात टाकलेले अखेरचे षटक चांगले गाजले. दिंडाच्या या अखेरच्या षटकात मुंबईच्या हार्दिक पांड्याने तुफानी फटकेबाजी करताना तब्बल ३० धावांची धुलाई केली. यासह हे षटक आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागडे अखेरचे षटक ठरले. या सामन्यात चार षटके टाकताना दिंडाने १४.२४ अशा अत्यंत वाईट इकॉनॉमी रेटसह ५७ धावांची खैरात केली. या कामगिरीसह दिंडा आयपीएलमध्ये डावातील अखेरच्या षटकात सर्वाधिक धावा देणारा ‘नंबर वन’ गोलंदाज ठरला. नुकताच झालेल्या या सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने दिंडाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर त्याने सलग दोन षटकार आणि एक चौकार मारत २२ धावा कुटल्या. पाचव्या चेंडूवरही पांड्याने षटकार मारला. यावेळी ५ चेंडूत २८ धावा झाल्यानंतर दिंडाने एक वाइड टाकला आणि अखेरच्या चेंडूवर मुंबईला बायच्या रुपाने एक धाव अतिरिक्त मिळाली. यासह दिंडाने अखेरच्या षटकात ३० धावा दिल्या. (वृत्तसंस्था)>काटेरी मुकुट दिंडाकडेच...२००९ च्या ‘आयपीएल’च्या सत्रात बांगलादेशच्या मशरफी मोर्तझाने डावातील अखेरच्या षटकात २६ धावांची खैरात केली होती. मात्र, दिंडाने देखील या महागड्या षटकाची बरोबरी करताना २०११ साली आणि २०१३ साली एका षटकात २६ धावा दिल्या होत्या. यानंतर, दिंडाचा हा विक्रम डेव्हिड हसी आणि राहुल शुक्ला यांनी मागे टाकला. या दोन्ही गोलंदाजांनी अनुक्रमे २०१३ आणि २०१४ साली प्रत्येकी २७ धावा दिल्या होत्या; परंतु आता दिंडाने पुन्हा एकदा सुमार मारा करताना हा ‘काटेरी मुकुट’ स्वत:कडे ठेवला आहे. आतापर्यंतचे महागडे ठरलेले अखेरचे षटक..अशोक दिंडा (पुणे) - ३० धावा वि. मुंबई, २०१७डेव्हिड हसी (पंजाब) - २७ धावा वि. मुंबई, २०१३.राहुल शुक्ला (दिल्ली) - २७ धावा वि. बँगलोर, २०१४.अशोक दिंडा (पुणे) - २६ धावा वि. बंगळुरू, २०१३.अशोक दिंडा (दिल्ली) - २६ धावा वि. पुणे, २०११.मशरफी मोर्तझा (कोलकाता) - २६ धावा वि. डेक्कन, २००९.