शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

कमकुवत गोलंदाजी अनेक संघांची अडचण

By admin | Updated: April 23, 2017 02:48 IST

गुजरातने योग्यवेळी केकेआरचा पराभव करीत स्पर्धेत पुनरागमन केले. गेल्या मोसमात साखळी फेरीअखेर अव्वल स्थानावर असलेला लायन्स संघ यंदा साधारण गोलंदाजीमुळे

सुनील गावसकर लिहितात...गुजरातने योग्यवेळी केकेआरचा पराभव करीत स्पर्धेत पुनरागमन केले. गेल्या मोसमात साखळी फेरीअखेर अव्वल स्थानावर असलेला लायन्स संघ यंदा साधारण गोलंदाजीमुळे संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. संघाची मुख्य ताकद फलंदाजी असून गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतरही लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकण्याची संधी असते, याची संघ व्यवस्थापनाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे शुक्रवारी ईडन गार्डन्सवर त्यांनी विजय नोंदवला. प्रत्येक फ्रेन्चायजी संघांसाठी चौथ्या विदेशी खेळाडूची निवड करणे डोकेदुखी ठरले आहे. तीन खेळाडूंची ते सहज निवड करतात, पण चौथ्या खेळाडूची निवड करताना त्यांना अडचण भासत आहे. चौथा खेळाडू अष्टपैलू असावा की स्पेशालिस्ट गोलंदाज असावा, याबाबत त्यांच्या मनात साशंकता असते. केकेआरविरुद्ध गुजरात संघव्यवस्थापनाने हॅट््ट्रिक घेणारा अँड्य्रू टायच्या स्थानी अनुभवी जेम्स फॉकनरला संधी दिली, पण माझ्या मते संघाचा समतोल साधण्यासाठी टायची निवड योग्य ठरली असती. बसिल थम्पी यॉर्कर व स्लोव्हरवनच्या जोरावर उपयुक्त ठरत आहे. ब्रॅन्डन मॅक्युलमसारख्या सिनिअर खेळाडूकडून युवा थम्पीला टिप्स मिळत असल्यामुळे त्याचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होत आहे. हे चांगले चित्र आहे. आयपीएलची ही विशेषता आहे. येथे अनोळखी भारतीय खेळाडूंना केवळ देशातीलच नव्हे तर विदेशातील सिनिअर खेळाडूंचे मार्गदर्शन मिळू शकते. जर गुजरातने थम्पी, टाय, फॉकनर व जडेजा यांच्यासह खेळण्याचा निर्णय घेतला तर त्यांना केवळ पाचव्या गोलंदाजाची चिंता भेडसावण्याची शक्यता आहे. पंजाब संघाला गोलंदाजांची चिंता भेडसावत आहे. त्यांनी आपली आवड-निवड न जोपासता सर्वोत्तम संघ निवडण्यावर भर द्यायला पाहिजे किंवा सातत्याने नाणेफेक जिंकून (अशक्य असलेली बाब) फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करण्यास सज्ज असायला हवे. हाशिम अमलाने शतकी खेळी केल्यामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर मिळाले असेल. अमलाच्या मेहनतीचे त्याच्या संघातील गोलंदाजांना चिज करता आले नाही. गुजरात लायन्सविरुद्धच्या पराभवानंतर कोलकाता संघ पुन्हा विजय मार्गावर परतण्यास उत्सुक असेल. सुनील नरेनला सलामीला खेळण्याची रणनीती उपयुक्त ठरत आहे. कर्णधार गौतम गंभीर व रॉबिन उथप्पा चांगल्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करीत आहेत. केकेआरपुढे अन्य संघांप्रमाणे गोलंदाजी हा मोठा चिंतेचा विषय नाही. नरेनप्रमाणे उमेश यादवही चांगली गोलंदाजी करीत आहे, पण कोल्टर नाईलच्या गोलंदाजीवर रैनाने खोऱ्याने धावा वसूल करीत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सध्या पिछाडीवर पडला आहे, पण दमदार पुनरागमन करण्याची क्षमता व कोहलीचा फॉर्म संघाची मुख्य ताकद आहे. अद्याप बऱ्याच लढती शिल्लक आहेत, पण बराच वेळ पिछाडीवर असणे धोक्याचा इशारा असल्याची सर्व संघांना कल्पना आहे. (पीएमजी)