शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कुंबळेची जागा भरून काढणे कठीण - वीरेंद्र सेहवाग

By admin | Updated: June 21, 2017 21:44 IST

भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबऴेच्या राजीनामानाट्यानंतर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असलेल्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय संघाचा प्रशिक्षक अनिल कुंबऴेच्या राजीनामानाट्यानंतर प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत असलेल्या वीरेंद्र सेहवागने प्रथमच आपली  प्रतिक्रिया दिली आहे. अनिल कुंबळेच्या राजीनाम्यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदावर निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे, असे वीरूने म्हटले आहे. 
वीरू म्हणाला की, " मी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली खेळलो नाही. पण त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. तो माझा सिनियर होता. इतकेच नाही तर माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन त्याच्याच कर्णधारपदाखाली झाले होते. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली आहे. आता त्याच्या राजीनाम्यानंतर जो कोणी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारेल, त्याच्यासाठी कुंबळेसारखी कामगिरी करणे कठीण असेल."  
अनिल कुंबळेने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या  श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे. काल संध्याकाळी अनिल कुंबळेने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. कुंबळे प्रशिक्षक म्हणून यशस्वी ठरला असला तरी त्याला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत चांगले संबंध राखता आले नव्हते. अखेर परिस्थिती चिघळल्यावर त्याने संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला.