शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

कर्णधार म्हणून धोनीचा आजचा शेवटचा सामना

By admin | Updated: January 10, 2017 07:48 IST

ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज, मंगळवारी होणाऱ्या भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड इलेव्हन संघातील एकदिवसीय सराव सामना क्रिकेटप्रेमींसाठी

मुंबई : ब्रेबॉर्न स्टेडियमवर आज, मंगळवारी होणाऱ्या भारत ‘अ’ विरुद्ध इंग्लंड इलेव्हन संघातील एकदिवसीय सराव सामना क्रिकेटप्रेमींसाठी विशेष ठरणार आहे. हा एक सर्वसामान्य सराव सामना असला तरी, कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी या सामन्यातून भारतीय संघाचे अखेरचे नेतृत्व करेल. त्यामुळेच या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.

नुकताच भारतीय क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर धोनी पहिल्यांदाच खेळणार असून, भारतीय संघाचे तो शेवटचे नेतृत्व करेल. त्याचवेळी या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असली तरी कडक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याने मोजक्याच क्रिकेटप्रेमींना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या दणक्यानंतर अध्यक्ष अनुराग ठाकूर व सचिव अजय शिर्के यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले. त्याचबरोबर अनेक मोठ्या पदाधिकाऱ्यांनाही बाहेरचा रस्ता पकडावा लागला. या मोठ्या घटनेनंतर होणारा हा पहिलाच सामना आहे. शिवाय मिळालेल्या माहितीनुसार, बोर्ड बाहेर गेलेल्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्याबाबत आपण असमर्थ असल्याचे कळविण्याबाबत बीसीसीआय मान्यताप्राप्त संघटनांना विनंती केली. त्याचप्रमाणे, सध्यातरी मुंबईत होणाऱ्या दोन्ही सराव सामन्यांवर कोणतेही काळे ढग नाहीत.

आज, मंगळवारी होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात कर्णधार धोनीशिवाय, स्टार अष्टपैलू युवराज सिंग, वेगवान गोलंदाज आशिष नेहरा या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर प्रमुख लक्ष असेल. या तिन्ही प्रमुख खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय व टी-२० मालिकेसाठी सराव म्हणून हा एकमेव सामना खेळण्याची संधी आहे.

दुसरीकडे या सामन्यातून इंग्लिश खेळाडूही स्वत:ला आजमावतील. कर्णधार इओन मॉर्गनसह अ‍ॅलेक्स हेल्स, जेसनराय आणि डेव्हीड विली आॅस्टे्रलियात सुरूअसलेल्या बिग बॅश टी-२० लीगमधील आपआपल्या संघातून भारत दौऱ्यावर आले आहेत, तर जो रुट १२ जानेवारीपासून संघात सहभागी होईल. रुटने वैयक्तिक कारणामुळे मायदेशी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिस्पर्धी संघभारत ‘अ’ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मनदीप सिंग, अंबाती रायडू, युवराज सिंग, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, आशिष नेहरा, मोहित शर्मा आणि सिद्धार्थ कौल.इंग्लंड इलेव्हन : इआॅन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टॉ, जॅक बॉल, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, लियाम डासन, अ‍ॅलेक्स हेल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशिद, जेसन राय, बेन स्टोक्स, डेव्हीड विली आणि ख्रिस वोक्स. स्थळ : बेबॉर्न स्टेडियम मुंबई ४वेळ दुपारी १. ३0 वाजता