शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

धोनीचे टीकाकारांना चोख उत्तर

By admin | Updated: April 22, 2017 23:14 IST

महेंद्र सिंह धोनी याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते, हे त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध केले. अखेरच्या तीन षटकांत ४२ धावांची गरज असताना त्याने संघाला अडचणीत बाहेर काढले.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 22  महेंद्र सिंह धोनी याला जगातील सर्वोत्तम फिनिशर का म्हटले जाते, हे त्याने आज पुन्हा एकदा सिद्ध केले. अखेरच्या तीन षटकांत ४२ धावांची गरज असताना त्याने संघाला अडचणीत बाहेर काढले आणि अटीतटीचा विजयही मिळवून दिला.
पुणे विरुद्ध हैदराबाद या सामन्यात विजयासाठी सगळ्यांच्याच पसंतीचा हैदराबादचा संघ होता. कागदावरदेखील हैदराबादचा संघ तसा मजबूतच होता.
 
फॉर्ममध्ये असलेले सलामीवीर, कर्णधार, त्यासोबतच भुवनेश्वर कुमार, राशिद खानची दमदार गोलंदाजी हे हैदराबादचे बलस्थान. मात्र या बलस्थानांना धुळीत मिळवण्याची धमक फक्त एकाच फलंदाजात होती तो म्हणजे धोनी. धोनीचा फॉर्म खराब असल्याने रायजिंग पुणे सुपर जायंट्ससाठी चिंतेची बाब होती. इतर खेळाडूही फारशी चमकदार कामगिरी करताना दिसून येत नव्हते. मात्र आजच्या सामन्यात धोनीने हे चित्रच पालटून टाकले.
 
हैदराबादने पुण्याला १७७ धावांचे आव्हान दिले. हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरुवातही चांगली केली. सलामीवीर अजिंक्य रहाणे दोन धावांवर बाद झाला. मात्र राहुल त्रिपाठी याने ४१ चेंडूतच ५९ धावा तडकावल्या. त्याला कर्णधार स्थिची साथ लाभली त्यानेही २७ धावा केल्या. मात्र सामन्यात खरी रंगत आली
 
ती स्मिथ आणि स्टोंक्स बाद झाल्यावर त्या वेळी संघाला २३ चेंडूंत तब्बल ५६ धावा हव्या होत्या. मनोज तिवारीने भुवनेश्वर कुमारला चौकार मारून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या तीन षटकांत पुण्याला विजयासाठी ४७ धावा आवश्यक होत्या. पुणे संघाला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागणार अशीच स्थिती होती. मात्र  जगातील सर्वोत्तम फिनिशरने १८ व्या षटकांत मोहम्मद सिराजला चौकार आणि षटकार ठोकला. पुढच्याच षटकांत वॉर्नरने आपले खास अस्त्र पर्पल कॅप असलेल्या भुवनेश्वरकडे चेंडू सोपवला. धोनीने त्याच्या गोलंदाजीची पिसे काढली. पहिल्या आणि दुसºया चेंडूवर चौकार तर तिस-या चेंडूवर षटकार ठोकला.  त्यानंतर अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत आपल्या खास शैलीत विजय मिळवून दिला.  धोनीने पहिल्या २३ चेंडूत २६ धावा केल्या तर नंतरच्या ११ चेंडूतच ३५ धावा कुटल्या.
 
पुणे संघाच्या मालकांनी धोनीच्या कामगिरीवर टीका केली होती. त्याचे कर्णधारपदही अचानक काढून टाकण्यात आले होते. तसेच या आयपीएल सत्रातही त्याची कामगिरी संघासाठी चिंतेची बाब ठरली होती. मात्र आजच्या या कामगिरीने धोनीने त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा कुल फिनिशरचे दर्शन घडवले.