शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

धोनी ब्रिगेडचा ‘सुपरसिक्स’

By admin | Updated: March 14, 2015 23:06 IST

सुरेश रैनाचे शतक (नाबाद ११० धावा) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (८५ धावा) झुंजार खेळीच्या बळावर भारताने विश्वचषकात विजयाचा ‘षट्कार’ खेचला.

ब्रँडनची शतकी खेळी व्यर्थ : झिम्बाब्वेवर सहा गड्यांनी मात करून भारत साखळी फेरीत अपराजितआॅकलंड : सुरेश रैनाचे शतक (नाबाद ११० धावा) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (८५ धावा) झुंजार खेळीच्या बळावर भारताने विश्वचषकात विजयाचा ‘षट्कार’ खेचला. शनिवारी झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेवर सहा गड्यांनी विजय नोंदवीत ‘ब’ गटात अव्वल स्थान पटकावले.अखेरचा सामना खेळणाऱ्या ब्रँडन टेलरच्या (१३८ धावा)शतकी खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने ४८.५ षटकांत सर्व बाद २८७ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ४८.४ षटकांत २८८ धावा करीत सामना जिंकला. सर्व सामने जिंकणाऱ्या भारताचा विश्वचषकातील विजयाचा विक्रम दहा सामन्यांचा झाला. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाने १९७५ ते ८३ यादरम्यान सलग विजयाची नोंद केली होती. भारताने हा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकात रिकी पाँटिंगच्या नेतृत्वात १९९९ ते २०११ या काळात आॅस्ट्रेलियाने सलग २४ सामने जिंकण्याचा विक्रम नोंदविला आहे. भारताला क्वार्टर फायनलमध्ये १९ मार्च रोजी बांगला देशविरुद्ध खेळायचे आहे. एक वेळ भारताची ४ बाद ९२ अशी नाजूक स्थिती होती; पण धोनी आणि रैना यांनी पाचव्या गड्यासाठी १५६ चेंडूंत विक्रमी १९६ धावांची भागीदारी केली. रैनाने नऊ चौकार व चार षट्कारांसह पाचवे शतक गाठले. त्याने पहिल्या ५० धावा ६७ चेंडूंत तर पुढच्या ५० धावा केवळ २७ चेंडूंत ठोकल्या. त्याआधी ४७ धावांवर असताना सिकंदर रझाच्या चेंडूवर शॉर्ट फाईनलेगवर हॅमिल्टन मस्कद्जाने त्याचा झेल सोडला होता. धोनीने पुन्हा एकदा ‘फिनिशर’ची भूमिका पार पाडली. ७६ चेंडू टोलविणाऱ्या माहीने आठ चौकार आणि दोन षट्कार खेचले. विजयी षट्कारही त्यानेच मारला. सुरुवात फारच खराब झाली होती. रोहित शर्मा १६, शिखर धवन ४ हे लवकर बाद झाले. विराट कोहली ३४ हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला; तर अजिंक्य रहाणे १९ धावा काढून परतला. झिम्बाब्वेने सध्याच्या स्पर्धेत भारताविरुद्ध सर्वोच्च धावा (२८७) नोंदविल्या. याआधी आयर्लंडने २५९ धावा उभारल्या होत्या. टेलरने ११० चेंडू खेळून १५ चौकार व ५ षटकारांसह १३८ धावा ठोकल्या. ९९ चेंडूंचा सामना करीत त्याने आठवे वन डे शतक गाठले होते. भारताविरुद्ध सध्याच्या स्पर्धेत शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. या कामगिरीबद्दल रैना, धोनी आणि धवन यांनी त्याचे अभिनंदन केले, तसेच भारतीय चाहत्यांनी उभे राहून सन्मान दिला. या सामन्यानंतर आर्थिक संकटात असलेला टेलर इंग्लंडमध्ये स्थायिक होणार आहे.(वृत्तसंस्था) निवृत्तीचे शतकसंघाचे लाल टी-शर्ट आणि सहकारी खेळाडूंची पुढील आयुष्यात नक्कीच कमतरता भासणार आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. ११ वर्षांच्या प्रवासात संघातील प्रत्येक खेळाडूंकडून मिळालेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही.- ब्रँडन टेलरदडपणाचा यशस्वी सामना केला!‘मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी दडपणाचा यशस्वी सामना केला. कोहलीने विजयाचा पाया रचला. रैना आणि मी मोठी भागीदारी केली. रैना पाचव्या स्थानावर आमचा मोलाचा खेळाडू आहे. आमच्यात मोठी भागीदारी झाली. आॅस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यानंतर जी विश्रांती मिळाली, तिचा मोठा लाभ विश्वचषकासाठी झाला. विजयावर शिक्कामोर्तब होईपर्यंत खेळपट्टीवर राहणे चांगले वाटते. रैनाचीही उत्तम साथ लाभल्याने शानदार विजय साकार होऊ शकला.’- महेंद्रसिंह धोनी, कर्णधार मोहम्मद शमीया स्पर्धेमध्ये शमीने पाच सामन्यात १८९ धावा देवून १५ विकेट मिळविल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.टर्निंग पॉर्इंटच्ब्रेंडन टेलर आणि एर्विन ही पाचव्या विकेटसाठी जमलेली जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरली होती. ही जोडी फोडण्यासाठी महेंद्रसिंह धोनीने गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात अनेक बदल केले, पण त्याला यश येत नव्हते. शेवटी मोहीत शर्माने ही कामगिरी फत्ते केली. त्याने ४२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शतकवीर टेलरला धवनकडे झेल देण्यास भाग पाडून ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने दुसरा सेट बॅटसमन क्रेग एर्विनला बाद केले. दोन सेट फलंदाज एकापाठोपाठ बाद झाल्याने झिम्बाब्वेला २८७ धावांत आॅल आऊट करणे शक्य झाले. ही जोडी जर लवकर फुटली नसती तर झिम्बाब्वेने ३०० चा आकडा सहज पार केला असता आणि या धावांचा पाठलाग कदाचित अशक्य होऊन बसला असता.च्धावांचा पाठलाग करण्यात माहिर असलेला भारतीय संघ आज वरच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे गडबडला. पण सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीने भरकटलेली गाडी रुळावर आणून ठेवली. धोनी नेहमीप्रमाणे डोक्यावर बर्फ ठेवूनच खेळत होता, पण रैना अधून-मधून मोठे फटके मारण्यास धजावत होता. धोनी त्याला वारंवार बजावत होता. ४७ धावांवर असताना रैनाने सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर लेगसाईडवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू टॉपएज लागून झेल उडाला. फाईनलेगवरील हॅमिल्टन मसाकडझा याला हा ‘लॉलीपॉप’ नीट झेलता आला नाही. हे जीवदान झिम्बाब्वेला महागात पडले. रैनाने या जीवदानाचा लाभ घेत शतक झळकावले, शिवाय भारताची नौकाही पैलतीरावर लावली. झिम्बाब्वे : सीजे चिभाभा झे. धवन गो. शमी ७, मस्कद्जा झे. धोनी गो. यादव २, मायर झे. धोनी गो. मोहित ९, ब्रँडन टेलर झे. धवन गो. मोहित १३८, सीन विलियम्स झे. आणि गो. आश्विन ५०, सी. इर्विन झे. आणि गो. मोहित २७, रझा त्रि. गो. शमी २८, चकाब्वा झे. रोहित गो. यादव १०, पेनियांगारा झे. यादव गो. शमी ६, मुपारिवा नाबाद १, चतारा त्रि. गो. यादव ०, अवांतर : ९, एकूण : ४८.५ षटकांत सर्व बाद २८७ धावा. गोलंदाजी : शमी ९-२-४८-३, यादव ९.५-१-४३-३, मोहित १०-१-४८-३, आश्विन १०-०-७५-१, जडेजा १०-०-७१-०.भारत : रोहित शर्मा झे. रझा गो. पेनियांगारा १६, शिखर धवन त्रि.गो. पेनयिांगारा ४, विराट कोहली त्रि.गो. रझा ३८, अजिंक्य रहाणे धावबाद १९, सुरेश रैना नाबाद ११०, महेंद्रसिंह धोनी नाबाद ८५, अवांतर : १६, एकूण ४८.४ षटकांत ४ बाद २८८ धावा. गोलंदाजी : पेनियांगारा ८.४-१-५३-२, चतारा १०-१-५९-०, मुपारिवा १०-०-६१-०, मायर ५-०-२९-०, विलियम्स ५-०-३१-०, रझा ८-०-३७-१, मस्कद्जा २-०-१५-०.२८८ ही वर्ल्डकप लढतीत लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आतापर्यंतच्या वर्ल्डकपमधील सर्वोत्तम धावसंख्या.१९६ सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनी यांनी केलेली नाबाद भागीदारी ही भारतातर्फे विश्वचषकातील सहाव्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी, तसेच वर्ल्डकपमध्ये धावांचा पाठलाग करताना नोंदवलेली सर्वोत्तम भागीदारी.१७४ धावांचा पाठलाग करताना ४ दिवस आधी शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी केली होती.६२.१४ या सरासरीने धोनी आणि रैना यांनी वनडेत भागीदारी केली आहे. या दोघांनी एकूण ६६ वेळा एकत्रित फलंदाजी केली आणि ९ वेळा शतकी व १७ वेळा अर्धशतकी भागीदारी केली. या सरासरीने केलेली भागीदारी ही दुसऱ्या क्रमांकाची ठरली. वनडेतील सर्वोत्तम सरासरीने धावांची भागीदारी करण्यात हाशिम आमला व एबी डिव्हिलियर्स (८९.९६ सरासरी) जोडी अव्वल आहे. या दोघांनी ८१.९६च्या सरासरीने ३५ वेळा भागीदारी केली आहे.७१.५० सुरेश रैनाची ही वर्ल्डकप सामन्यातील सरासरी. त्याने विश्वचषकातील ७ डावांत २८६ धावा ठोकल्या आहेत, तसेच झिम्बाब्वेविरुद्ध फटकावलेले शतक हे वर्ल्डकपमधील त्याचे पहिले शतक ठरले.१५५ या स्ट्राईक रेटसह टेलरने आर. आश्विनच्या २७ चेंडूंत ४२ धावा ठोकल्या. त्यात ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तसेच, रवींद्र जडेजाविरुद्ध त्याने १४२च्या स्ट्राईक रेटने ३१ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या.टीम इंडियाने टाकले विंडीजला मागेच्विश्वचषक स्पर्धेत सलग दहाव्या विजयासह महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने शनिवारी स्पर्धेतील सलग विजयांच्या बाबतीत ७० व ८०च्या दशकातील क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीज संघाला पिछाडीवर टाकले आहे. च्लॉईडच्या नेतृत्वाखालील कॅरेबियन संघाने १९७५ ते १९७९ दरम्यानच्या विश्वचषक स्पर्धेत सलग ९ विजय मिळविले होते. धोनीच्या संघाने आज झिम्बाब्वेचा ६ विकेटनी पराभव करीत सलग दहाव्या विजयाची नोंद केली.विश्वचषक स्पर्धेत सलग जास्त विजयाचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. त्याच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाने वर्ल्डकपमध्ये सलग २४ सामने जिंकले होते.विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक १३ विजयांचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर कपिल देव (११), मोहंमद अजहरुद्दीन (१०) आणि सौरभ गांगुली (९) यांचा क्रमांक लागतो. धोनीने या स्पर्धेतच परदेशातील भूमीवर ११० सामन्यांत ५८ विजय मिळविणाऱ्या गांगुलीलाही मागे टाकले आहे. (वृत्तसंस्था)