शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच विराटच्या नेतृत्वाखाली खेळणार धोनी, युवीचे पुनरागमन

By admin | Updated: January 6, 2017 17:13 IST

महेंद्रसिंग धोनीने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार विराट कोहलीची भारताच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 6 - महेंद्रसिंग धोनीने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे कसोटी कर्णधार विराट कोहलीची भारताच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि तीन ट्वेंटी-20 भारतीय संघ आज जाहीर करण्यात आला. त्यावेळी विराटच्या कर्णधारपदी निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. या तीन सामन्यांसाठी निवडलेल्या संघात नुकतेच कर्णधारपद सोडणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे धोनी प्रथमच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच युवराज सिंगचेही संघात पुनरागमन झाले आहे. 

( 'विराट' अपेक्षांचा भार पेलण्यासाठी कोहली सज्ज )

 

आज मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या  पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आणि तीन ट्वेंटी-20 भारतीय  संघ जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद यांनी निवडलेल्या संघांची घोषणा केली. विराटने कसोटी कर्णधार म्हणून केलेली कामगिरी विचारात घेऊन त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात येत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवराज सिंगने केलेली कामगिरी विचारात घेऊन त्याला संघात पुन्हा स्थान देण्यात आल्याचेही प्रसाद म्हणाले. 

( कूल कप्तानीचे पर्व संपले!



   भारतीय संघ (एकदिवसीय) : विराट कोहली (कर्णधार), महेंद्र सिंग धोनी, लोकेश राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव. 

भारतीय संघ (ट्वेंटी-20)  : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, मनदीप सिंग, लोकेश राहुल,  युवराज सिंग, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पांड्या,  आर. अश्विन, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, मनीष पांडे, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, आशीष नेहरा