पर्थ : आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, परदेशात या फिरकी गोलंदाजांबाबत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चिंता व्यक्त केली आहे. गोलंदाजांचा दिवस खराब असू शकतो; परंतु आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेली यांनी आश्विन-जडेजाच्या १८ षटकांमध्ये १२९ धावा ठोकल्या. या दोन्ही गोलंदाजांवर त्याला पूर्ण विश्वास आहे; परंतु सपाट खेळपट्टीवर हे दोन्ही गोलंदाज पहिल्या लढतीत अयशस्वी ठरले. त्यामुळे संघ व्यवस्थापनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. (वृत्तसंस्था)
फिरकी गोलंदाजांबाबत धोनी चिंतित
By admin | Updated: January 14, 2016 03:10 IST