शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

धोनीने जिंकले मन, तर बंगालने सामना

By admin | Updated: March 19, 2017 02:14 IST

महेंद्रसिंह धोनीने काही गगनचुंबी षटकार ठोकताना चाहत्यांची मने जिंकली; परंतु बंगालच्या युवा संघाने जबरदस्त जिद्द दाखवत झारखंडवर ४१ धावांनी मात करीत विजय

नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनीने काही गगनचुंबी षटकार ठोकताना चाहत्यांची मने जिंकली; परंतु बंगालच्या युवा संघाने जबरदस्त जिद्द दाखवत झारखंडवर ४१ धावांनी मात करीत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. आता बंगालची गाठ पडणार आहे ती तामिळनाडूविरुद्ध.याआधी बंगालला २00८-0९ आणि २00९-१0 मध्ये अंतिम फेरीत सलग दुसऱ्यांदा पराभव पत्कारावा लागला होता. अभिमन्यू ईश्वरन (१0१ धावा) आणि श्रीवत्स गोस्वामी (१0१ धावा) यांची शानदार शतकी खेळी आणि मनोज तिवारीच्या स्फोटक ७५ धावांच्या बळावर बंगालने ५0 षटकांत ४ बाद ३२९ अशी विशाल धावसंख्या रचली. क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक असणाऱ्या धोनीने ६२ चेंडूंत ७0 धावांची वादळी खेळी करताना प्रतिस्पर्धी गोटात धडकी भरवली; परंतु झारखंडचा संघ ५0 षटकांत २८८ धावांत सर्वबाद झाला. धोनीने त्याच्या खेळीत चार षटकार ठोकले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे २ हजारांपेक्षा जास्त उपस्थित प्रेक्षक निराश झाले नाहीत. धोनीने आॅफस्पिनर आमिर गनीला लाँगआॅनवर दोन गगनचुंबी षटकार ठोकले. धोनीला इशांक जग्गी (४३ चेंडूंत ५९ धावा) चांगली साथ दिली; परंतु बंगालचे क्षेत्ररक्षण खूप चांगले होते. धोनी आणि जग्गी यांनी प्रज्ञान ओझा याचा चांगलाच समाचार घेतला. त्याआधी ईश्वरन आणि श्रीवत्स या दोघांनी शतकी खेळी करतानाच सलामीसाठी १९८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर तिवारीने त्याच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारत बंगालचा विजय सुकर केला. ईश्वरनने ११७ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले आणि एक षटकार खेचला, तर गोस्वामीने ९९ चेंडूंत ११ चौकार मारताना १ षटकार ठोकला.संक्षिप्त धावफलक ५0 षटकांत ४ बाद ३२९. (श्रीवत्स गोस्वामी १0१, अभिमन्यू ईश्वरन १0१, मनोज तिवारी ७५. वरुण अ‍ॅरोन २/८९, मोनू कुमार १/४0). झारखंड : ५0 षटकात २८८. (महेंद्रसिंह धोनी ७0, इशांक जग्गी ५९, सौरभ तिवारी ४८. प्रज्ञान ओझा ५/७१, सायन घोष २/५२, कनिष्क सेठ २/४८).