शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धोनी, गांगुलीनंतर बीसीसीआयचा सचिनलाही धक्का

By admin | Updated: April 23, 2017 08:35 IST

सचिनसाठी नियमात बदल का करावा? असा सवाल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि, 23 - सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार आहे हे सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी बीसीसीआयकडे सचिनचे काही व्हिडीओ फुटेज मागितले होते. हे व्हिडीओ सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण बीसीसीआयकडून यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. त्यामुळे सचिनच्या बायोपिकसाठी निर्मात्यांना बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी निश्चित दर भरावे लागणार आहेत. धोनीच्या बायोपिकसाठी दरांमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नाही, तर सचिनसाठी बीसीसीआयने आपल्या नियमात बदल का करावा? असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने निर्मात्याला केला केला.सचिन : अ बिलियन्स ड्रीम्स या सचिनच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी नॉट आऊट 200 निर्मात्यांनी बीसीसीआयकडे त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या क्षणांचे व्हिडीओ मागितले होते. यासाठी बीसीसीआयने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावरील बायोपिकसाठी त्याचा बिझनेस पार्टनर अरुण पांडे यांनी काही व्हिडीओसाठी बीसीसीआयशी संपर्क साधला होता. यावेळी बीसीसीआयनं त्या व्हिडीओसाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील हे स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही काही व्हिडीओंची गरज होती, तेव्हा त्यालाही बीसीसीआयकडून आकारण्यात आलेलं शुल्क भरावं लागलं. त्यामुळे सचिनसाठी नियमात बदल का करावा? असा सवाल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी एक दर निश्चित करण्यात आले असून, सामन्यांचं महत्त्व लक्षात घेऊन हे दर निश्चित करण्यात आलेत. बीसीसीआयकडून व्हिडीओमधील प्रत्येक सेकंदानुसार दर आकारले जातात. पण सचिनच्या निवृत्तीवेळीच्या वानखेडे स्टेडिअमवरील 3 मिनिट 50 सेकंदाच्या भाषणाचा व्हिडीओ कोणतंही शुल्क न आकारता उपलब्ध करुन देण्यास बीसीसीआयनं सहमती दर्शवली असल्याचं समजत आहे.

दरम्यान, प्रत्येक क्रिकेटरच्या स्वप्नातील सचिन तेंडूलकरचा प्रवास सचिन अ बिलियन ड्रीम या त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातून पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटापूर्वी सचिन प्लेइंग विथ माय वे या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचला होता. त्याच्या आयुष्यातील अगदी महत्त्वाच्या गोष्टी पुस्तकाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर देखील त्याच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल तमाम भारतीयांमध्ये उत्सुकता दिसून येते. नुकतेच सचिनने 100 एमबी हे अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यामातून सचिन आपल्या चाहत्याशी कनेक्ट राहत आहे. जेम्स अर्सकाईन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित सचिन अ बिलियन ड्रीम या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा चित्रपट 26 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता मयुरेश पेम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा भाऊ नितीन तेंडुलकरची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरमधील सचिनची काही वाक्यं अक्षरश: मनाचा ठाव घेणारी आहेत. क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं होतं. असं म्हणत सचिननं या ट्रेलरमध्ये आपली क्रिकेटविषयी असणारी भावना व्यक्त केली आहे. या सिनेमात खुद्द सचिन तेंडुलकरनं भूमिका साकारली आहे. हा सिनेमा वास्तवावर बेतलेला असल्यानं याचा ट्रेलरही तसाच करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे. यात सचिन आणि त्याच्या कुटुंबीयांची काही जुनी दृश्यही दाखवण्यात आली आहे.