शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धोनीने अनेकदा बाहेर होण्यापासून वाचवले

By admin | Updated: January 8, 2017 03:44 IST

महेंद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी कर्णधार नव्हे तर रक्षणकर्ताही होता. अनेकदा त्याने मला संघाबाहेर होण्यापासून वाचविल्याची कबुली तिन्ही प्रकारातील नवनियुक्त कर्णधार

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी हा माझ्यासाठी कर्णधार नव्हे तर रक्षणकर्ताही होता. अनेकदा त्याने मला संघाबाहेर होण्यापासून वाचविल्याची कबुली तिन्ही प्रकारातील नवनियुक्त कर्णधार विराट कोहली याने दिली.२००८ मध्ये कोहलीने श्रीलंकेत पदार्पण केले. तेव्हापासून धोनीच्या नेतृत्वात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या नात्याने खेळला. धोनी माझा मार्गदर्शक राहिला असे सांगून विराट पुढे म्हणाला,‘सुरुवातीच्या अपयशानंतरही धोनीने माझ्यावर विश्वास दाखवित वारंवार संधी दिली. अनेकदा संघाबाहेर होण्यापासून त्यानेच मला वाचविले.’कर्णधार म्हणून धोनीचे स्थान घेणे अनेकांना शक्य नाही. धोनीची पोकळी भरून काढणे देखील सोपे जाणार नाही. महेंद्रसिंग धोनीचे नाव ओठावर येताच सर्वांत आधी कर्णधार डोळ्यापुढे येतो. कुठल्याही खेळाडूशी त्याची तुलना होऊ शकणार नाही. माझ्यासाठी धोनी नेहमीच कर्णधार राहील, असे विराटने सांगितले. धोनीने बुधवारी वन डे तसेच टी-२० चे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर निवड समितीने कोहलीकडे तिन्ही प्रकारात नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेत पहिला सामना १५ जानेवारी रोजी पुण्यात खेळला जाईल. (वृत्तसंस्था)नेतृत्वासाठी सज्ज - कोहलीकसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आल्यानंतर आश्चर्यचकित झालेला विराट आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार बनण्यासाठी नव्या दमाने सज्ज झाल्याचे दिसत आहे. नेतृत्वगुण शिकल्यामुळे आपण सज्ज असल्याचे कोहलीचे मत आहे.कसोटीत नेतृत्व कसे करतात हे समजण्यास थोडा वेळ लागला. झटपट क्रिकेटमध्ये कसे नेतृत्व करतात हे मला कळले असल्याने आत्मविश्वास बळावला आहे. मी धोनीची पंरपरा पुढे नेणार असल्याने अवांतर जबाबदारीचा मला निश्चितपणे लाभ होईल. मी गाफिल राहणारा खेळाडू नाही. शिवाय फाजील आत्मविश्वासही बाळगत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूला तुल्यबळ मानून मी पुढे पाऊल टाकत असल्याने धोनीची विजयी परंपरा पुढे नेण्याचा विश्वास असल्याचे मत विराटने व्यक्त केले.धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. तो म्हणाला,‘ अ‍ॅडिलेड कसोटीच्या एक दिवस आधी धोनी उद्या सामना खेळणार नाही, असे मला सांगण्यात आले होते. मी नेतृत्व करणार हे ऐकून मला आश्चर्य वाटले. पण नवी जबाबदारी मला बरेच शिकवून गेली. कसोटीतील नेतृत्व शानदार राहिल्याने झटपट क्रिकेटमध्ये प्रेरणा मिळेल.’