शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यात धोनीने रचला इतिहास

By admin | Updated: April 8, 2017 19:39 IST

इंडियन प्रिमियर लिगच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध झालेल्या सामन्यात पुणे सुपरजायंट्सच्या महेंद्र सिंग धोनीच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला

ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 8 - इंडियन प्रिमियर लिगच्या किंग्स इलेव्हन पंजाबविरूद्ध झालेल्या सामन्यात पुणे सुपरजायंट्सच्या महेंद्र सिंग धोनीच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. हा धोनीचा 250 वा टी-20 सामना होता. हा रेकॉर्ड करणारा धोनी भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.  
 
धोनीनंतर या यादीत सुरेश रैनाचं नाव येतं. रैनाने आतापर्यंत 246 टी-20 सामने खेळले आहेत.  तर जगात सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या केरॉन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 359 टी-20 सामने खेळले आहेत.   
या सामन्यापूर्वी 249 सामन्यात धोनीने 37.78 च्या सरासरीने आणि 135.73 च्या स्ट्राइक रेटने 5063 धावा बनवल्या. यामध्ये 19 अर्धशतकांचा समावेश आहेत. विशेष म्हणजे 250 सामने खेळणा-या धोनीला टी-20मध्ये शतक ठोकण्यात अजून यश मिळालेलं नाही. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 358 चौकार आणि 210 षटकार ठोकले आहे. 
 
या सामन्यात पंजाबने पुण्याचा 6 विकेट राखून सहज पराभव केला. सामन्यामध्ये धोनीला लौकीकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सुरूवातीच्या विकेट झटपट गेल्यानंतर  पुण्याची सर्व मदार धोनीवर होती. पण 11 चेंडूत केवळ पाच धावा काढून तो बाद झाला. 
 
आयपीएलच्या या सत्रात धोनी पहिल्यांदाच एक खेळाडू म्हणून खेळत आहे. त्याच्याजागी स्टिव्ह स्मिथकडे पुण्याच्या संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.