शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

धवनची दीडशतकी खेळी

By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST

कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत

बंगळुरू : कर्णधार शिखर धवनची दीडशतकी खेळी आणि करुण नायर व विजय शंकर यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात दमदार आघाडी घेणाऱ्या भारत ‘अ’ संघाने सोमवारी दुसऱ्या दिवशी बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात २ बाद ३६ अशी अवस्था केली. येथे खेळल्या जात असलेल्या तीनदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात आज पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या दिवसअखेर भारत ‘अ’ संघाने वर्चस्व मिळवले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे जवळजवळ अडीच तासांचा खेळ वाया गेला असला तरी भारत ‘अ’ संघाने सामन्यावर पकड मजबूत करण्यात यश मिळवले आहे. धवनने रविवारी पहिल्या दिवशी शतक पूर्ण केले होते. त्याने १५० धावांची खेळी केली, तर तमिळनाडूचा अष्टपैलू नायरने ७१ व विजय शंकरने ८६ धावांचे योगदान दिले. भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ५ बाद ४११ धावसंख्येवर घोषित करीत पहिल्या डावात १८३ धावांची दमदार आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेश ‘अ’ संघाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ३६ धावांची मजल मारली होती. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप १४७ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कर्णधार मोमिनुल हक (९) अणि यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास (७) खेळपट्टीवर होते. त्याआधी, कालच्या वैयक्तिक ११६ धावसंख्येवरून पुढे खेळताना धवनने काही चांगले फटके लगावले. वैयक्तिक १५० धावा फटकावल्यानंतर सकलेन साजिबच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो पायचित झाला. धवनने १४६ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व ३ षटकार लगावले. धवन बाद झाल्यानंतर श्रेयांश अय्यरही (३८) झटपट बाद झाला. त्यानंतर नायर व विजय शंकर यांनी चौथ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी केली. नमन ओझाने (नाबाद २५) शंकरच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर असतानाच पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. पुन्हा खेळ प्रारंभ झाल्यानंतर भारत ‘अ’ संघाने लवकरच डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशतर्फे लेगस्पिनर जुबेर हुसेनने दोन बळी घेतले. त्याने नायर व शंकर यांना तंबूचा मार्ग दाखवला. बांगलादेश ‘अ’ संघाची दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. ईश्वर पांडेने (४ धावांत १ बळी) तिसऱ्या षटकात अनामुल हक (०) याला माघारी परतवले. सौम्या सरकारला (१९) जयंत यादवने बाद केले. अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळपूर्वीच थांबविण्यात आला. (वृत्तसंस्था)----संक्षिप्त धावफलक : बांगलादेश अ पहिला डाव : ५२.४ षटकात सर्व बाद २२८; दुसरा डाव : ११ षटकांत २ बाद ३६. भारत पहिला डाव : ८६.१ षटकांत ५ बाद ४११ घोषित : शिखर धवन १५०, अभिनव मुकुंद ३४, श्रेयांश अय्यर ३८, करुण नायर ७१, विजय शंकर ८६, नमन ओझा नाबाद २५, जुबेर हुसेन २/७६).