शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

धवनची कमाई कोहलीपेक्षा जास्त

By admin | Updated: June 9, 2017 04:07 IST

बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मिळणाऱ्या करमुक्त मानधनात तो मागे पडला आहे.

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार प्रायोजनातून मिळणाऱ्या रकमेत सर्वांच्या पुढे असला तरी बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मिळणाऱ्या करमुक्त मानधनात तो मागे पडला आहे. २०१५-१६ या मोसमात दिल्लीचा सहकारी आणि टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन हा कोहलीपेक्षा वरचढ ठरला. बीसीसीआयने २५ लाखापेक्षा अधिक मानधन मिळणाऱ्या खेळाडूंची यादी वेबसाईटवर प्रकाशित केली. त्यानुसार धवनला वर्षभरासाठी ८७.७६ लाख तर कोहलीला ८३.०७ लाख इतकी रक्कम मिळाली. या यादीत सर्वाधिक करमुक्त रक्कम मिळविणाऱ्या खेळाडूंमध्ये अजिंक्य रहाणेला ८१.०६ लाख मिळाले. रविचंद्रन अश्विन आणि रोहित शर्मा यांना प्रत्येकी ७३.०२ लाख रुपये मिळाले असून दोघेही संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.वरुण अ‍ॅरोन याला सर्वांत कमी म्हणजे ३२.१५ लाख रुपये मिळाले. सर्वच खेळाडूंना मागच्या मोसमात न्यूझीलंड, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध स्थानिक सामन्यात खेळल्याबद्दल मॅचफिस देण्यात आली आहे. याशिवाय बीसीसीआयकडून घोषित रोख पुरस्कार तसेच आयसीसीकडून कसोटी रँकिंगसाठी मिळालेल्या बक्षिसाचा वाटा देखील देण्यात आला. ही सर्व रक्कम करमुक्त आहे. डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा याला २०१६ च्या आयपीएल सत्रात जखम झाली होती. त्यासाठी त्याला १ कोटी ५२ लाख रुपये भरपाई म्हणून मिळाले. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या बीसीसीआय प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी यांच्यासह पाच महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयने एकरकमी लाभांश म्हणून प्रत्येकी ३० लाख रुपये दिले आहेत. अन्य चार खेळाडूंमध्ये अंजूम चोप्रा, नीतू डेव्हिड, शुभांगी कुलकर्णी आणि सुधा शाह यांचा समावेश आहे. बीसीसीआयने बेंगळुरु येथे एनसीएसाठी जमीन खरेदी करण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले.(वृत्तसंस्था)