शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

दिव्यांश पन्वरने विश्व विक्रम टाकला मागे; महाराष्ट्राची नुपूर पाटील ज्युनियर गटात अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 01:55 IST

महाराष्ट्राची नुपूर पाटील यांनी १० व्या आर.आर लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धेतअन अनुक्रमे सिनियर आणि ज्युनियर गटात विजेतेपदाचा मान पटकावला.

पुणे : राजस्थानच्या दिव्यांश पन्वरने १० मीटर एअर राईफल प्रकारात पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखताना २५२.३ अशी सर्वोत्तम कामगिरी करताना आर. आर. लक्ष्य चषक नेमबाजी निमंत्रित स्पर्धेत वरिष्ठ गटातील २५१.२ गुणांचा विश्व विक्रम मागे टाकत खळबळ उडवून दिली. महाराष्ट्राची नुपूर पाटील यांनी १० व्या आर.आर लक्ष्य कप नेमबाजी स्पर्धेतअन अनुक्रमे सिनियर आणि ज्युनियर गटात विजेतेपदाचा मान पटकावला.पनवेल येथिल कर्नाला स्पोटर््स अकॅडमीमधील लीय शूटिंग क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत दिव्यांशने एप्रिल २०१८ मध्ये चिंगवॉन (कोरिया) येथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत रशियाच्या अ‍ॅलेक्सझांडर ड्रायगेनने नोंदविलेला २५१.२ गुणांचा विक्रम मागे टाकला. आर्मीच्या रणजीत सिंघ (२४८.७) याला दुसऱ्या स्थानावर तर हरियाणाच्या जे. साहिल याला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.महाराष्ट्राच्या नुपूर पाटीलने शेवटच्या फेरीत अचूक नेमबाजी करीत ज्युनियर गटात अजिंक्यपदाचा मान मिळविला. एकूण २५०.५.५ गुणांची कमाई करताना नुपूरने या स्पर्धेत पहिल्या फेरीपासून अव्वलस्थानावर असणाºया मध्य प्रदेशच्या तोमर ऐश्वर्य (२४९.७) याला ०.८ गुणांनी मागे टाकत विजेतेपदावर नाव कोरले. राजस्थानच्या यश वर्धन (२२६.५) याला मात्र तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले.ऐश्वार्यला पाचव्या आणि सहाव्या शॉटवर फक्त १९.४ गुण मिळविता आले. तर त्याच दरम्यान नुपूरने २०.७ अशी गुंकामाई केली व तिथेच विजेतेपदाच्या दिशेने तीची पावले सरकू लागली. शेवटच्या चार फेरीदरम्यान ऐश्वर्यने ४२.१ अशी कमी केली तर नुपूरने ४१.१ अशी गुणसंख्या नोंदवत विजेतेपद हातचे जाणार नाही याची खात्री केली.दिव्यांश पन्वर याने ६३०.३ क्वालिफिकेशन गुणांची तर ज्युनियर गटातील विजेत्या नुपूर पाटील हिने ६२६.४ गुणांची कमी केली. ज्युनियर गटातून यश वर्धन याने ६२७.१ अशी सर्वोत्तम क्वालिफिकेशन गुणांची कमी केली.सिनियर गटातील विजेत्याला एक लाख रुपये रोख आणि लक्ष्य कप तर उपविजेत्याला ६० हजार रुपये रोख तर तृतीय स्थानावरील खेळाडूला ४० हजार रुपये रोख पारितोषिक मिळाले. ज्युनियर गटातील विजेत्या नुपुरला ५० हजार रुपये व लक्ष कप तर दुसºया स्थानावरील ऐश्वर्य तोमरला तीस हजार रुपये आणि तिसºया क्रमांकावरील यश वर्धन याला २० हजार रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.भारताचे भूतपूर्व प्रमुख प्रशिक्षक संन्नी थोमस, आॅलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर, दीपाली देशपांडे यांच्या हस्ते विजेत्यांना गरविण्यात आले.

टॅग्स :Shootingगोळीबार