शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

आॅस्ट्रेलियाचा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार

By admin | Updated: January 23, 2015 01:08 IST

कर्णधार जॉर्ज बेलीसह तीन प्रमुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.

होबर्ट : कर्णधार जॉर्ज बेलीसह तीन प्रमुख्य खेळाडूंच्या अनुपस्थितीतही आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तिंरगी मालिकेत इंग्लडविरुद्ध शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत यजमान आॅस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पहिल्या दोन्ही लढतीत विजय मिळविणारा यजमान संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आॅस्ट्रेलिया संघाला शुक्रवारच्या लढतीत कर्णधार जॉर्ज बेलीची उणीव भासणार आहे. भारताविरुद्धच्या लढतीत संथ षटकगतीसाठी बेलीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मॅच फिटनेसच्या कारणास्तव शेन वॉटसन व डेव्हिड वॉर्नर यांना विश्रांती देण्यात आलेली आहे. इंग्लंडला पहिल्या लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, पण त्यानंतर त्यांनी भारताविरुद्ध दुसऱ्या सामन्यात बोनस गुणासह विजय मिळविला. आॅस्ट्रेलियाने आणखी एक विजय मिळविला तर १ फेब्रुवारी रोजी पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीसाठी त्यांचे स्थान पक्के होईल. प्रभारी कर्णधार स्टिव्हन स्मिथ कसोटी मालिकेतील शानदार फॉर्म वन-डे मालिकेतही कायम राखण्यास उत्सुक आहे. भारताविरुद्धच्या लढतीत इंग्लंड संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून यजमान संघातील नियमित खेळाडूंच्या अनुपस्थिचा लाभ घेण्यास इंग्लंड संघ प्रयत्नशील आहे. आॅस्ट्रेलियाने वॉर्नरच्या स्थानी शॉन मार्शचा तर वॉटसनच्या स्थानी कॅमरुन व्हाईटचा समावेश केला आहे.