शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

दिल्लीचा ‘डायनामिक’ खेळ

By admin | Updated: October 15, 2014 04:23 IST

सामन्याचा पहिला हाफ अटीतटीचाच राहिला. दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाल्याने जवाहरलाल स्टेडियमवरील वातावरण तापले होते

दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान दिल्ली डायनामोस संघाने नावाप्रमाणे ‘डायनामिक’ खेळ करून चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या या डायनामिक खेळाला पुणे सिटी एफसीकडून तोडीसतोड उत्तर मिळाले मंगळवारी झालेली ही लढत गोलशुन्य राहिली.सामन्याचा पहिला हाफ अटीतटीचाच राहिला. दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाल्याने जवाहरलाल स्टेडियमवरील वातावरण तापले होते. ब्रुनो सिरीलिओ आणि डॅनिएल मॅग्लीओछेट्टी या पुणेरी जोडीने चेंडू आपल्याजवळ ठेवून गोलपोस्टपर्यंत हळुहळू आगेकूच केली होती, परंतु दिल्लीच्या शौविक घोष याने चेंडू हिसकावला. घोषने चेंडूवरील ताबा न सोडता गोलपोस्टपर्यंत घेऊन गेला आणि स्टेडियमवर जल्लोषाला उधाण आले. आक्रमक खेळाच्या रणनितीने मैदानात उतरलेल्या दिल्लीचा हा खेळ पाहून चाहत्यांमधला उत्साह वाढला. ५व्या मिनिटाला सिरीलिओ याने गोलपोस्टपासून ३० यार्ड दूर असलेल्या दिल्लीच्या मॅड जंकर याला पाडल्याने सामन्याचा पहिला फाऊल झाला. दिल्लीची भर आक्रमणावरच असल्याने त्यांच्याकडून वारंवार हल्ले होत होते. मात्र पुण्याचा गोली एमॅन्युएल बेलार्डी हा त्यांचे आक्रमण चोखपणे परतवत होता. दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांमध्ये टशन पाहायला मिळाली. ४९व्या मिनिटाला डॅनिएल मॅग्लीओछेट्टी उजवीकडून चेंडू गोलपोस्ट पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. त्याने गोलपोस्टच्या दिशेने टोलावलेला चेंडू सिरीलीओ याने अचुक हेरला आणि तो धर्मराज रावनान याला पास केला. पुण्याचा गोल होतो की काय?, या चिंतेने स्टेडियमवर स्तब्धता आली होती, परंतु पुण्याला अपयश आले. चुरशीच्या या लढतीत ५३व्या मिनिटाला दिल्लीला गोल करण्याची पुन्हा संधी मिळाली. दिल्लीला मिळालेल्या फ्रि किकचे रुपांतर गोलमध्ये करण्यासाठी डेल पिएरोने पुढाकार घेतला आणि स्टेडियमवर त्याच्या नावाचा डंका वाजू लागला. पिएरोला गोल करण्यात अपयश आल्याने दिल्लीच्या पदरी निराशा आली. ५७व्या मिनटाला दिल्लीचा कर्णधार जंकर चेंडू घेऊन अगदी गोलपोस्ट नजीक पोहचला होता. मात्र बेलार्डीने चेंडूवर झडप घातल्याने दिल्लीची आणखी एक संधी हुकली. ५९व्या मिनिटाला पुण्याने कोस्तास कात्सोरानिस याच्या जागी मेहराजुद्दीन वाडू याला मैदानावर आणले. आपल्या आक्रमणाला अधिक धार आणण्यासाठी पुण्याने ६०व्या मिनिटाला दुडू ओमांगबेमी याला मैदानावर उतरवले. ६७व्या मिनिटाला क्वांग एल पार्क याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याने पुण्याला धक्का बसला. त्याजागी एम पानाडेंटीगुरी याचे आगमन झाले. ९० मिनिटांत सामना गोलशुन्य राहिल्याने अतिरिक्त वेळेत आक्रमण अधिक वाढले. गुस्तावो सांतोस याने डाव्या पायाने टोलावलेला चेंडू गोली बेलार्ड यालाही चकवून गोल पोस्टच्या दिशेने सरकला, मात्र चेंडू गोलपोस्टच्या पोलला लागून माघारी परतला आणि दिल्लीचा विजय हिरावला.