शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीने लक्ष्याचा पाठलाग करावा

By admin | Updated: April 19, 2017 01:49 IST

सनरायजर्स हैदराबाद संघाला फलंदाजांकडून मोठ्या खेळीची गरज आहे. डेव्हिड वॉर्नरने लढवय्या बाणा दाखविला असला तरी, गत चॅम्पियन संघाला दिमाखदारपणे आगेकूच करायची

रवी शास्त्री लिहितात...सनरायजर्स हैदराबाद संघाला फलंदाजांकडून मोठ्या खेळीची गरज आहे. डेव्हिड वॉर्नरने लढवय्या बाणा दाखविला असला तरी, गत चॅम्पियन संघाला दिमाखदारपणे आगेकूच करायची असेल तर युवराज सिंग व शिखर धवन यांना कामगिरीत सातत्य राखावे लागेल. म्हातारा झालेला सिंह शिकारीला निघालेला आहे, हे दाखविण्याची गरज नाही. मोईसेस हेन्रिक्सची कामगिरी समाधानकारक आहे. पण अडचणीच्या स्थितीत विश्वास व्यक्त करता येईल, अशी ओळख त्याने निर्माण केलेली नाही. अन्य खेळाडू एखाद्या वेळी छाप सोडण्यात यशस्वी ठरले आहेत. हे सर्व लक्षण लक्ष्य देण्यापेक्षा लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती देणाऱ्या संघाचे आहे. रात्री होणाऱ्या लढतीत लक्ष्याचा पाठलाग करणे चांगला पर्याय ठरतो. अशास्थितीत जास्तीत जास्त संघ प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करतात. कृत्रिम प्रकाशझोतात चेंडू बॅटवर चांगला येतो, पण दिल्ली डेअरडेव्हिल्सने मात्र दुसरा पर्याय निवडला. युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाचा कर्णधार झहीर खानने दडपणाखाली लक्ष्याचा पाठलाग करण्यापेक्षा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्याने फलंदाजांमध्ये लक्ष्याचा बचाव करण्याचा विश्वास निर्माण केला आहे. माझ्या मते, हैदराबाद विरुद्धच्या लढतीत दिल्लीने आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून लक्ष्याचा पाठलाग करण्यास पसंती द्यायला हवी. उप्पल स्टेडियमची खेळपट्टी नंतर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी अनुकूल राहील. हैदराबाद संघ आपल्या गोलंदाजीबाबत साशंक आहे. भुवी व राशिद खान फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. पण मुस्तफिजूर रहमान व बरिंदर सरण यांचे पुनरागमन अपेक्षेनुसार झाले नाही. आशिष नेहरच्या गोलंदाजीवरही धावा फटकावल्या गेल्या. पाच सामन्यांमध्ये युवराजने अद्याप एकही चेंडू टाकलेला नाही. युवराजचा गोलंदाजीमध्ये वापर होणे अपेक्षित आहे. या सामन्याच्या निमित्ताने पंत व राशिद यांची जुगलबंदी अनुभवण्याची संधी मिळेल. संजू सॅमसनविरुद्ध भुवी कशी गोलंदाजी करतो, याबाबत उत्सुकता आहे. भुवीने आतापर्यंत या स्पर्धेत १५ बळी घेतले आहेत. केन विलियम्सनला हैदराबादतर्फे आपली पहिली लढत खेळण्याची संधी मिळते का, याबाबतही उत्सुकता आहे. दिल्लीची गोलंदाजी बघितल्यानंतर विलियम्सनला संधी देण्याची वेळ आलेली आहे, असे वाटते. (टीसीएम)