शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हॅन्डस्प्रिंग प्रकारात दीपाला जिंकायचेय राष्ट्रकुलचे सुवर्ण - दीपा करमाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:33 IST

रिओ आॅलिम्पिकमधील शानदार कामगिरीमुळे प्रोदुनोव्हाची ओळख बनलेली भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकर ही आता ‘व्हॉल्ट आॅफ डेथ’च्याही पुढे ‘हॅन्डस्प्रिंग ५४०’ प्रकरात राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकण्यास उत्सुक आहे.

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील शानदार कामगिरीमुळे प्रोदुनोव्हाची ओळख बनलेली भारताची जिम्नॅस्टिकपटू दीपा करमाकर ही आता ‘व्हॉल्ट आॅफ डेथ’च्याही पुढे ‘हॅन्डस्प्रिंग ५४०’ प्रकरात राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकण्यास उत्सुक आहे.रिओमध्ये चौथ्या स्थानावर राहिलेल्या दीपाच्या उजव्या गुडघ्याला जखम झाली असल्याने ती सध्या कुठल्याच स्पर्धेत सहभागी झालेली नाही. एप्रिल महिन्यात शस्त्रक्रियेमुळे ती आशियाई स्पर्धा तसेच कॅनडात झालेल्या विश्व चॅम्पियनशिपला मुकली. आॅस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाºया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी ती सज्ज होणार आहे. शुक्रवारी २४ वा वाढदिवस साजरा करणारी त्रिपुराची ही खेळाडू नवे तंत्र शिकत आहे. हॅन्डस्प्रिंगमधील ५४० डिग्री टर्न हे ते नवे तंत्र असून याद्वारेच राष्ट्रकुलचे सुवर्ण जिंकायचे आहे. हा कठीण प्रकार असला तरी प्रोदुनोव्हासारखा कठीण नाही, असे दीपाने सांगितले.तंत्र बदलाचे कारण विचारताच दीपा म्हणाली,‘मला अलीकडे जखम झाली आहे. मी अधिक जोखीम पत्करू इच्छित नाही. माझे लक्ष्य २०२० टोकियो आॅलिम्पिक आहे. प्रोदुनोव्हा प्रकाराशिवाय मला हॅन्डस्प्रिंगमध्येही यश मिळवायचे आहे.’ प्रोदुनोव्हा तंत्रात निपुण असलेली दीपा जगातील पहिल्या पाच खेळाडूंपैकी एक आहे.दीपाला आधीपासून दोन व्हॉल्ट येतात मी बेसिक सरावाद्वारे तिला नवे तंत्र शिकवित आहे. दोन महिन्यांनंतर कामगिरीचा आढावा घेऊ. हॅन्डस्प्रिंगमधून अधिक गुण मिळविले जाऊ शकतात, असे वाटल्यामुळेच पुढील पाच महिने दीपाला हॅन्डस्प्रिंगमध्ये सज्ज करण्यावर भर देणार आहे. महिला जिम्नॅस्टिकसाठी एकूण पाच व्हॉल्ट गट असतात. अंतिम फेरीतील पात्रतेसाठी दोन वेगळे व्हॉल्ट अवगत असणे अनिवार्य आहे.- बिश्वेश्वर नंदी, कोचदीर्घकाळ स्पर्धात्मक वातावरणापासून दूर राहिल्याने राष्टÑकुल स्पर्धेत कामगिरीवर विपरीत परिणाम होईल, ही शक्यता दीपाने फेटाळून लावली. ती म्हणाली,‘सरावाबाबत बोलाल तर मी स्पर्धात्मक तंत्र ओळखूनच झपाट्याने सराव करणार आहे.’दीपाला स्वत:च्या आत्मचरित्राबद्दल विचाराताच ती म्हणाली, ‘हा निर्णय माझ्या कोचचा असेल.ते म्हणतील तसेच मी करणार आहे. माझा आणि त्यांचा अशाप्रकाराचा संबंध आहे.’