नवी दिल्ली : ग्रँड स्लॅम किताबांचा बादशाह रॉजर फेडरर आणि भारताची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोन यांनी दिल्लीत झालेल्या इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) मध्ये टेनिस कोर्टवर उपस्थिती दर्शवून क्रीडाप्रेमींचे मनोरंजन केल़े
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दीपिकासह बॉलिवूडस्टार आमिर खान, अक्षयकुमार, रितेश देशमुख यांनी कोर्टवर टेनिस खेळण्याचा आनंद लुटला़ इंदिरा गांधी स्टेडियमवर रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच यांच्यातील भारतात होणारा पहिला सामना बघण्यासाठी मोठय़ा संख्येने प्रशंसक उपस्थित होत़े मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी बॉलिवूड सिता:यांनी उपस्थिती दर्शवून प्रेक्षकांची मने जिंकली़
या वेळी पहिला सामना आमिर खान व फेडरर, तर सानिया मिङर व नोव्हाक जोकोविच जोडीमध्ये खेळविण्यात आला़ उपस्थित प्रेक्षकांनी या सामन्याला चांगलीच दाद दिली़ यानंतर दीपिका, अक्षय आणि रितेश यांनीसुद्धा टेनिस कोर्टवर ग्लॅमर तडका लावला़ भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरही टेनिस कोर्टवर उतरल़े गावसकर इंडियन एसेस संघाचे सहमालक आहेत़ या व्यतिरिक्त मोहंमद अझहरुद्दीन, आयपीटीएलचा संस्थापक
महेश भूपती त्याची पत्नी अभिनेत्री लारा दत्ता यांचीही या वेळी उपस्थिती होती़ (वृत्तसंस्था)