शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
2
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
3
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
4
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
5
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
6
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
7
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
8
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
9
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
10
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
11
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
12
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
13
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
14
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
15
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
16
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
17
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
18
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
19
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
20
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड

दीपा कर्माकरने पटकावले अंतिम फेरीत स्थान; भारताला पदकाची आशा

By admin | Updated: August 8, 2016 18:43 IST

दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्‍स वॉल्टमध्ये चोख कामगीरी करत अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत ८ व्या क्रमांकावर राहत स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ८ - रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिला दिवस भारतासाठी निराशाजनक गेला होता, आज दुसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशाच आली. पण दीपा कर्माकरने जिम्नॅस्टिक्‍स वॉल्टमध्ये चोख कामगीरी करत अंतिम फेरीच्या पात्रता फेरीत ८ व्या क्रमांकावर राहत स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवले आहे. जिम्नॅस्टिक्‍सच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय महिला ठरली आहे. 14.850 गुणासह दीपाने ८ वे स्थान कायम ठेवले. ऑलिम्पिकच्या ५२ वर्षात भारतातर्फे जिम्नॅस्टिक्‍स सपर्धेत खेळणारी दीपा पहिली महिला खेळाडू आहे. जिम्नॅस्टिक्‍स महिला पात्रता फेरीतील सबडिव्हिजन 3 मध्ये उत्कृष्ठ प्रदर्षन करताना दीपाने १४.८५ गुण मिळवले. 
 
दीपाने वॉल्टमधील कठीन असलेल्या प्रोदुनोवा उत्कृष्ठ रित्या करताना रिओ -16 मध्ये भारतातर्फे अंतिम फेरित पात्र ठरणारी पहिली खेळाडू ठरली आहे. पण दीपाची सर्व-सुमारे कामगिरीही सरासरीच राहिली. ३६ खेळाडूंमध्ये तिला २७ स्थान मिळवता आले तर तिचे एकूण गुण ५१.६६५ इतकं आहेत. दीपाने यापुढे उत्कृष्ठ कामगिरी केल्यास भारत पदकाचे खाते नक्कीच उघडेल. 
 
दरम्यान, पहिल्या दिवशी हमखास पदकाची अपेक्षा असलेल्या जीतू रायने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात निराशा केली.  जीतूने अंतिम फेरी गाठली मात्र तिथे  त्याला 78.7 गुणांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. टेनिसमध्ये पदकाचे दुसरे आशास्थान असलेले लिएंडर पेस-रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरे यांना पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला.