शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावरील वस्त्रबंदीचा निर्णय फिबाने बदलला

By admin | Updated: May 10, 2017 00:54 IST

विश्वचषक बास्केटबॉल संघटना फिबाने खेळाडूंच्या डोक्यावर बांधण्यात येणाऱ्या वस्त्रांसंदर्भातील बंदीच्या निर्णयात बदल केला आहे.

मुंबई : विश्वचषक बास्केटबॉल संघटना फिबाने खेळाडूंच्या डोक्यावर बांधण्यात येणाऱ्या वस्त्रांसंदर्भातील बंदीच्या निर्णयात बदल केला आहे. यामुळे भारतामधील शीख खेळाडूंना चीनमध्ये होणाऱ्या फिबा बास्केटबॉल विश्वचषक २०१९ पात्रता फेरीत खेळता येईल.हा वादग्रस्त नियम बदलण्याचा निर्णय ४ मे रोजी फिबाच्या पहिल्या मध्यावधीत काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी भारताचे शीख खेळाडू अमरज्योत आणि अमृतपाल सिंह यांना २०१४ साली चीनमध्ये वुहान येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी आपली पगडी काढावी लागली होती.१३९ राष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फिबा काँग्रेसच्या बैठकीत सर्वानुमते या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. यात खेळाडूंना आपल्या डोक्यावरील वस्त्र म्हणजे पगडी, हिजाब आणि किप्पा परिधान करून खेळण्याची परवानगी असेल. तीन वर्षांपूर्वी फिबाने आपल्या अधिकृत बास्केटबॉल नियमात २०१४ च्या अंतर्गत ४.४.२ अनुसार कोणताही खेळाडू मैदानावर पगडी, हिजाब, केसांच्या सजावटीचे साहित्य अथवा दागिने घालून खेळणार नाही, याचा समावेश केला होता. या निर्णयावर टीका झाली.