शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक स्पर्धेतील प्रवेशाचा निर्धार

By admin | Updated: July 5, 2017 01:37 IST

‘डायमंड लीग नक्कीच महत्त्वाची स्पर्धा होती. परंतु, भालाफेक प्रकारात अव्वल तीन क्रमांकामध्ये येणं हे माझे मुख्य लक्ष्य नव्हते. या

रोहित नाईक/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘डायमंड लीग नक्कीच महत्त्वाची स्पर्धा होती. परंतु, भालाफेक प्रकारात अव्वल तीन क्रमांकामध्ये येणं हे माझे मुख्य लक्ष्य नव्हते. या स्पर्धेत अनेक चॅम्पियन्स खेळाडू होते. त्यांच्यापुढे मला माझी क्षमता आजमवायची होती. स्पर्धेतील माझ्या कामगिरीवर मी खूष आहे, असे ८४.६७ मीटरची फेक करुन पाचव्या स्थानी राहिलेल्या नीरजने लोकमतला सांगितले.नीरज म्हणाला, ‘डायमंड लीगने मला खूप शिकवले. जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे जवळून निरिक्षण करण्याची संधी मिळाली. हे खेळाडू स्वत:वर जास्त दबाव येऊ देत नाही. त्यांचे मुख्य लक्ष्य सर्वोत्तम कामगिरीचे असते. महत्त्वाची बाब म्हणजे ते खेळाचा आनंद घेतात. त्यामुळे स्पर्धेची परिस्थिती चांगल्या पध्दतीने हाताळण्यात त्यांना यश येते. अनेकांनी माझ्या कामगिरीचे कौतुक केले तेव्हा आत्मविश्वास वाढला. जागतिक दर्जाच्या खेळाडूंकडून होत असलेल्या कौतुकाचा आनंद वेगळा होता.‘अगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझी कसून तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व माझ्याकडे सोपविले असल्याने मी सज्ज असून खूप उत्सुकही आहे. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश करण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे, असे भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघाचा कर्णधार आणि भालाफेकीमध्ये ज्यूनिअर विश्वविक्रम रचणाऱ्या नीरज चोप्राने सांगितले. नुकताच पॅरिस येथे झालेल्या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेद्वारे नीरजने वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदार्पण केले. भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलै दरम्यान रंगणाऱ्या आशियाई अजिंक्यपदमध्ये स्वत:ची छाप पाडण्यास सज्ज असलेल्या नीरजने म्हटले की, ‘लहानपणापासून माझे देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते आणि आशियाई स्पर्धेत मी भारताचे नेतृत्व करणार, यासारखा दुसरा आनंद नाही. अनेक नावाजलेले खेळाडू असूनही कर्णधार म्हणून माझी निवड झाली, यासाठी मी स्वत:ला नशिबवान मानतो.’डोपिंगसारख्या घटनांपासून दूर राहण्यासाठी मी खबरदारी घेतोय. रोजच्या खाण्याच्या पदार्थांशिवाय इतर पदार्थ मी टाळतो. मी कधी गोळ्या घेत नसल्याने अशा गोष्टींमुळे दूर असतो. डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतली तर खेळाडू डोपिंगपासून नक्कीच दूर राहतील.- नीरज चोप्रा नीरजची कामगिरी..२०१६ २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत ८६.४८ मीटरची फेक सुवर्ण पदकासह विश्वविक्रम नोंदवला. २०१६ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत ८२.२३ मीटरची फेक करुन सुवर्ण पदक पटकावले.