वन-डे क्रिकेट मालिका : भारत-इंग्लंड चौथी लढत आज
बर्मिगहॅम : पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळविणारा भारतीय संघ मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणा:या चौथ्या लढतीत मालिका विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दुस:या वन-डे लढतीत डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर 133 धावांनी, तर तिस:या लढतीत 6 गडी राखून विजय मिळविणारा भारतीय संघ मालिकेत 2-क्ने आघाडीवर आहे. यापूर्वी ब्रिस्टलमध्ये पहिली लढत पावसामुळे रद्द झाली होती. एजबेस्टनमध्ये मंगळवारी भारतीय संघ मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यास उत्सुक आहे. दोन सामने जिंकणा:या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणा:या इंग्लंड संघाला वन-डे क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत अद्याप सूर गवसलेला नाही. कर्णधार अॅलेस्टर कुक टीकाकारांचे लक्ष्य ठरला आहे. कुकने दोन्ही लढतींत एलेक्स हेल्सच्या साथीने सलामीला अर्धशतकी भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडला प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये विजय मिळविता आलेला नाही. 2क्13मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडमध्ये विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांनी 2क्14मध्ये सुरुवातीला विंडीजचा पराभव केला होता, तर आर्यलड व स्कॉटलंडविरुद्ध प्रत्येकी एक विजय मिळविला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोनदा पराभव स्वीकारणा:या इंग्लंडला श्रीलंकेविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले. शिखर धवनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. रोहित दुखापग्रस्त झाल्यामुळे रहाणोला सलामीवीराची भूमिका बजवावी लागत आहे. रोहित व धवन यांच्या उपस्थितीत रहाणो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. रहाणो सलामीला आल्यामुळे अंबाती रायडूला संधी मिळाली. रायडूने मिडलसेक्सविरुद्ध सराव सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती. त्याला संधी मिळाल्यानंतर ट्रेंटब्रिजमध्ये कारकिर्दीतील सवरेत्तम नाबाद 64 धावांची खेळी केली. दरम्यान, मुरली विजयला रोहितचा पर्याय म्हणून संघात सामील करण्यात आलेले आहे. त्यामुळे टीम इंडियापुढे संघ निवड करताना पेच निर्माण झाला आहे. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली, अजिंक्य रहाणो, सुरेश रैना, अबांती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅम्सन, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, कर्ण शर्मा, मोहित शर्मा, उमेश यादव, मोहंमद शमी, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड : अॅलिस्टर कुक (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलेन्स, इयान बेल, जोस बटलर, स्टीव्हन फिन, हॅरी गर्ने, अॅलेक्स हेल्स, ािस जॉर्डन, इयान मॉर्गन, जो रुट,
बेन स्टोक्स, जेम्स ट्रेडवेल व ािस व्होक्स.