शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

डी कॉकचा शतकी तडाखा

By admin | Updated: April 18, 2016 02:50 IST

आक्रमक फलंदाज क्विंटन डी कॉकने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ७ गडी राखून लोळवले.

बंगळुरू : आक्रमक फलंदाज क्विंटन डी कॉकने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ७ गडी राखून लोळवले. यंदाच्या मोसमातील पहिले शतक झळकावताना डी कॉकने ५१ चेंडंूत १०८ धावा फटकावल्या. करुण नायरनेही ५४ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकरांना १९२ धावांचे तगडे आव्हान दिले. परंतु, डी कॉकने संघाला एकहाती विजयी करताना आरसीबीच्या हातातील सामना हिसकावून घेतला. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. श्रेयस अय्यर व संजू सॅमसन स्वस्तात परतल्यानंतर डी कॉक - करुण यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३४ धावांची निर्णायक भागीदारी करून संघाला विजयी मार्गावर आणले. शेन वॉटसनने डी कॉकला बाद करून ही जोडी फोडली खरी, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डी कॉकने ५१ चेंडूंत तब्बल १५ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. करुणने अखेरपर्यंत नाबाद राहत ४२ चेंडूंत ६ चौकार व एक षटकार खेचत ५४ धावा काढल्या. डी कॉकनंतर करुण व जेपी ड्युमिनी यांनी संघाच्या विजयावर शिक्का मारला. दिल्लीने १९.१ षटकांत ३ बाद १९२ धावा काढल्या. तत्पूर्वी, विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल पुन्हा ‘फेल’ ठरल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स यांचा तुफानी अर्धशतकी हल्ला व अष्टपैलू शेन वॉटसनचा तडाखा या जोरावर आरसीबीने दिल्लीविरुद्ध ५ बाद १९१ अशी मजल मारली. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने गेलला शून्यावर माघारी धाडत पहिल्याच षटकात आरसीबीला मोठा झटका दिला. मात्र यानंतर कोहली - एबी यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर दिल्लीवर हल्ला चढवून दुसऱ्या गड्यासाठी १०७ धावांची भागीदारी केली. एबीने ३३ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह ५५ धावा फटकावल्या. एबी बाद झाल्यानंतर कोहलीने वॉटसनसह मोर्चा सांभाळला. वॉटसन १९ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार ठोकून ३३ धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर परतला. कोहलीही ४८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांवर शमीचा शिकार ठरल्याने आरसीबीच्या धावसंख्येला अंतिम क्षणी खीळ बसली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ५ बाद १९१. (विराट कोहली ७९, एबी डिव्हिलियर्स ५५, शेन वॉटसन ३३; मोहम्मद शमी २/३४) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.१ षटकांत ३ बाद १९२. (क्विंटन डी कॉक १०८, करुण नायर नाबाद ५४; शेन वॉटसन २/२५).