नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघटनेमध्ये (डीडीसीए) कुठलाही भ्रष्टाचार नसून जर आप सरकारला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली तर राज्य संघटना चौकशीसाठी तयार आहे, असे मत डीडीसीएचे उपाध्यक्ष चेतन चौहान यांनी व्यक्त केले. कीर्ती आजाद यांच्या नेतृत्वाखालील असंतुष्ट गटाने डीडीसीएमध्ये कथित आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने राज्य संघटनेच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. माजी क्रिकेटपटू चौहान यांनी डीडीसीएची कार्यप्रणाली पारदर्शी असल्याचे म्हटले आहे. चौहान म्हणाले, ‘‘केंद्र सरकारची मंजुरी मिळते किंवा नाही, हे बघावे लागले. आम्ही रजिस्ट्रार आॅफ सोसायटीजअंतर्गत संलग्न आहोत, पण त्यानंतरही त्यांना मंजुरी मिळाली तर सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. सध्या आम्ही सीबीआय व आरओसीच्या चौकशीला सामोरे जात आहोत. त्यामुळे जी माहिती हवी असेल ती उपलब्ध करून देण्यात येईल. सहकार्य करण्याचे हे प्रकरण नसून चौकशीच्या वेळी मागवलेले कागदपत्रे आम्ही उपलब्ध करून देऊ.’’ (वृत्तसंस्था)
मंजुरीनंतर डीडीसीएचे चौकशीला सहकार्य
By admin | Updated: December 30, 2015 03:07 IST