शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘डेव्हिस कप’ प्रकाशझोतात

By admin | Updated: August 29, 2016 01:53 IST

स्पेनच्या मजबूत संघाविरोधात भारत डेव्हिस कपच्या सामन्याचे आयोजन प्रकाशझोतात करणार आहे.

नवी दिल्ली : स्पेनच्या मजबूत संघाविरोधात भारत डेव्हिस कपच्या सामन्याचे आयोजन प्रकाशझोतात करणार आहे. दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनने पुढील महिन्यात होणारा विश्व ग्रुप प्ले आॅफ सामना प्रकाशझोतात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना प्रकाशझोतात आयोजित करण्यात येईल.पहिल्या दिवशी १६ सप्टेंबरला दोन एकेरी सामने सायंकाळी पाच वाजता सुरू होतील, तर दुहेरीची लढत पुढच्या दिवशी सायंकाळी होणार आहे. अखेरच्या दिवशी सायंकाळी दोन एकेरी सामने होतील.डीएलटीएच्या कार्यकारी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर २०१४ मध्ये सर्बियाच्या विरोधात झालेल्या विश्व ग्रुप प्ले आॅफचे सामने दुपारी तीन वाजता सुरू करण्यात आले होते. त्यामुळे भारताचे स्पेन विरोधातील सामने उशिरा सुरू केले जाऊ शकतात. डीएलटीएच्या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘प्रेक्षकांनी हे सामने बघावे ही आमची इच्छा आहे. यामुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढेल. आम्ही यावर विचार केला की, कशा पद्धतीने अधिक लोकांना टेनिस स्टेडियममध्ये आणता येईल. भारतीय प्रेक्षकांच्या सोयीसाठी आम्ही वेळ निवडत आहोत. स्पेन आणि भारताच्या स्टार खेळाडूंचा खेळ पाहण्यापासून प्रेक्षकांना वंचित ठेवता येणार नाही.’अधिकारी म्हणाले की, ‘सायंकाळी सामने सुरू झाल्याने खेळाडू आपल्या क्षमतेनुसार खेळ करू शकतील. आम्ही याबाबत खेळाडूंशी चर्चा केली आहे आणि त्यांच्या सहमतीनेच हा निर्णय घेण्यात आला आहे.’ हे सामने रोमांचक असतील, कारण स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल याने म्हटले आहे की, भारत दौऱ्याचा त्याच्या कार्यक्रमात समावेश राहील.