ऑनलाइन टिम नाताळ, दि १७ - अमेरिका व घाना दोन्ही संघाचे खेळाडू मैदानावर येताच खेळाच्या पहिल्याच मिनिटाला अमेरिकेन खेळाडू गोल नोंदवत प्रेक्षकांसह फुटबॉलच्या जाणकारांनाही धक्का दिला. समालोकानेही आत्तापर्यंतच्या इतिहासात खेळाच्या पहिल्या मिनिटाला गोल झाला नाही असं म्हणत डेम्प्सी वर स्तुती सुमन उधळली. पहिल्या भागात अमेरिका एकच गोल करण्यात यशस्वी झाली असली तरी घाना ची रण निती उधळण्यात त्यांना वेळ खर्च करावा लागला. तसेच दुस-या भागात डेम्प्सीने पुन्हा गोलपोस्ट ला टार्गेट केले असता बॉल थेट गोलकिपर अदम क्वारासे च्या हातात गेल्याने डेम्प्सीला गोल करता आला नाही. खेळाचा दुसरा भाग संपत आळा तरीही घानाचा एकही गोल न झाल्याने संघाचे कोच आणि खळाडू यांच्यावर दबाव वाढतच होता. अँड्री आयुने गोल केल्यावर सर्व घाना समर्थकांच्या उत्साहाला उधाण आलंच पण स्वतः अँड्री आयुने उर बडवत आफ्रिकन पद्धतीने आनंदव्यक्त केला. घानाचा गोल गंभीरपणे घेत फक्त पाचच मिनिटात म्हणजे खेळाच्या ८६ व्या मिनिटाला अमेरिकेच्या ब्रुक्सने गोल केला. अनेक प्रयत्न करूनही घानाला दुसरा गोल करणे शक्य न झाल्याने सामना अमेरिकेने सर केला.
अमेरिकेची घानावर घाणाघाती मात
By admin | Updated: June 17, 2014 06:01 IST