शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

द.आफ्रिकेचा भारतावर विजय

By admin | Updated: October 2, 2015 22:55 IST

पहिल्या टी-२० सामन्यामध्ये द. आफ्रिकेने भारतावर ७ गड्यानी विजय मिळवत गांधी-मंडेला मालिकेची विजयाने सुरुवात केली.

ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. २ - पहिल्या टी-२० सामन्यामध्ये द. आफ्रिकेने भारतावर ७ गड्यानी विजय मिळवत  गांधी-मंडेला मालिकेची विजयाने सुरुवात केली. जेपी ड्युमिनीच्या नाबाद ६८ (३४) आणि एबी डिव्हिलियर्स ५१ धावांच्या बळावर २०० धावांचे अवघड लक्ष लिलया पार केले. अक्षर पटेलच्या १६व्या षटकात ड्युमिनीने सलग ३ षटकार लगावत २३ धावा वसूल करुन सामन्याचे चित्र पालटले. त्यापुर्वी, 
द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या शानदार शतकी खेळीमुळे भारताने द. आफ्रिकेला २०० धावांचे आव्हान दिले.  भारताने या सामन्यात २० षटकात १९९ धावा केल्या आहेत.
द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या  रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पहिल्या तीन षटकात चांगली खेऴी केली. मात्र चौथ्या षटकात शिखर धवन अवघ्या तीन धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताच्या धावसंख्येत वाढ करण्यास मोलाची कामगिरी केली. विराट कोहली ४३ धावांवर झेलबाद झाला. त्याला गोलंदाज काईल ऍबॉटने झेलबाद केले. त्यापाठोपाठ लगेचच रोहित शर्माही झेलबाद झाला. रोहित शर्माने ६६ चेंडूत १२ चौकार आणि पाच षटकार लगावत १०६ धावा केल्या. सुरेश रैना १४ धावांवर पायचीत झाला तर अंबाती रायडू शून्य धावेवर धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद २० धावा केल्या, तर अक्षर पटेलने दोन धावा केल्या. द. आफ्रिकेकडून गोलंदाज काईल ऍबॉटने दोन आणि ख्रिस मॉरिसमे एक बळी टिपला. 
या सामन्यात श्रीनाथ अरविंदने पदार्पण केले असून अजिंक्य रहाणे, हरभजनसिंग, स्टअर्ट बिन्नी व अमित मिश्राला विश्रांती देण्यात आली आहे.