शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

CWG 2018: हिना सिद्धूला सुवर्ण, सचिन चौधरीला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 04:59 IST

पिस्तुल नेमबाज हिना सिद्धूने मंगळवारी नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरीने डोपिंग इतिहासाची पार्श्वभूमी मागे सोडताना कांस्यपदकावर नाव कोरले.

ब्रिस्बेन / गोल्ड कोस्ट : पिस्तुल नेमबाज हिना सिद्धूने मंगळवारी नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकावले, तर पॅरापॉवरलिफ्टर सचिन चौधरीने डोपिंग इतिहासाची पार्श्वभूमी मागे सोडताना कांस्यपदकावर नाव कोरले. २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या सुवर्णपदक पटकावण्याची वाटचाल आज सहाव्या दिवशी काही अंशी संथ झाली.भारोत्तोलन स्पर्धा आता संपली असून कुस्ती स्पर्धेला अद्याप प्रारंभ झालेला नाही. बॉक्सर्स पदकांच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे भारताला आज अधिक पदकांची कमाई करता आलेली नाही. पदकतालिकेत भारत यजमान आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी कायम आहे. ब्रिस्बेन बेलमोट शूटिंग सेंटरमध्ये भारतीय नेमबाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे, पण भारताची सुरुवात विशेष चांगली झाली नाही. कारण गगन नारंग व चैन सिंग पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोनमध्ये पदक पटकावण्यात अपयशी ठरले. भारताला आज दुसरे पदक पॅरा पॉवरलिफ्टर चौधरीने मिळवून दिले. त्याने पुरुषांच्या हेवीवेट फायनलमध्ये १८१ किलो वजन पेलले. हे पदक त्याच्यासाठी संजीवनीप्रमाणे आहे. कारण २०१४ मध्ये डोपिंगमध्ये अडकल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.बॉक्सर्ससाठीही आजचा दिवस शानदार ठरला. भारताच्या पाचपैकी तीन खेळाडूंनी आपापल्या लढती जिंकून पदक निश्चित केले. एमसी मेरी कोम हिने ४८ किलो गटात आधीच उपांत्य फेरी गाठल्याने या खेळात किमान सहा पदके मिळतील, याची खात्री पटली. अ‍ॅथलेटिक्सच्या ४०० मीटर दौडमध्ये मोहम्मद अनस याला कांस्यपदकाने हुलकावणी देताच तो चौथ्या स्थानी राहिला. हिमा दास हिने महिलांच्या ४०० मीटर दौडमध्ये अंतिम फेरी गाठली. भारताच्या आशा आज बुधवारी असतील त्या नेमबाजांवर. दहा मीटरमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर जीतू राय ५० मीटर पिस्तुलमध्ये उतरणार आहे. बॅडमिंटनमध्ये किदाम्बी श्रीकांत, सायना नेहवाल व सिंधू हेदेखील वैयक्तिक मोहिमेची सुरुवात करणार आहेत. (वृत्तसंस्था)>२१ पदकांसह भारत तिसºया स्थानीअनुभवी मनोजकुमार (६९), अमित पंघाल (४९) आणि मोहम्मद हसमुद्दीन (५६) १९ वर्षांचा नमन तंवर (९१), आशियाडचा कांस्यविजेता सतीश कुमार (९१ पेक्षा अधिक) यांनी पदकाच्या शर्यतीत स्वत:ला कायम ठेवले. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत सिद्धूने नवा स्पर्धा विक्रम नोंदवताना सुवर्णपदक पटकावले.भारताने आतापर्यंत ११ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कांस्य पदकांची कमाई केली आहे.>अनसचे कांस्य हुकले, हिमा ४०० मीटर फायनलमध्येमोहम्मद अनस याने ४०० मीटरचा राष्टÑीय विक्रम नोंदविला पण त्याला राष्टÑकुलमध्ये कांस्य पदकाने हुलकावणी दिली. तो चौथ्या स्थानावर राहिला. अनसने ४५.३१ सेकंद वेळ नोंदवित आपल्याच विक्रमात सुधारणा केली. मागच्या वर्षी नवी दिल्लीत इंडियन ग्रॅन्डप्रिक्समध्ये त्याची वेळ ४५.३२ सेकंद होती. १९५८ मध्ये महान धावपटू मिल्खासिंग यांनी राष्टÑकुलच्या ४०० मीटर दौडमध्ये भाग घेत अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर हा मान अनसला मिळाला आहे. अनसला प्रयत्न जमेकाचा जेव्हेन फ्रान्सिस याने ४५.०९ सेकंद वेळ नोंदवित व्यर्थ ठरविला. बोट्स्वानाचा इसाक मकवालाने सुवर्ण आणि बाबोलोकी थेबे याने रौप्य जिंकले. हिमा दास महिलांच्या ४०० मीटर दौडमध्ये ५१.५३ सेकंद या वैयक्तिक कामगिरीसह अंतिम फेरीत दाखल झाली. उपांत्य फेरीत ती तिसºया स्थानावर होती. अंतिम फेरीत स्थान मिळविणाºया आठ धावपटूंमध्ये तिने ०.४४ सेकंद वेळ सुधारून सातव्या स्थानावर आली.>सात्विक - अश्विनीची शानदार सुरुवातगोल्ड कोस्ट : सात्विक साईराज रांकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी आज फक्त २० मिनिटांतच विजय मिळवत २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या मिश्र दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत दुसºया फेरीत स्थान मिळवले.सात्विक आणि अश्विनी यांनी पहिल्या फेरीत ग्रुनसेच्या स्टुअर्ट हार्डी आणि चोले ली टीसीअर यांना सरळ गेममध्ये २१-९, २१-५ असे पराभूत केले.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८