शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘राष्ट्रकुल’च्या शासकीय विदेशवारीत ‘कपात’; अधिकारी, नातेवाईकांवर उधळपट्टी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:16 IST

आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे पुढील महिन्यात ४ एप्रिलपासून आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. क्रीडा मंत्रालय खेळाडूंसोबत जाणा-या अधिका-यांच्या पथकास कात्री लावणार असल्याने अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय शासकीय खर्चाने विदेशवारी करू शकणार नाहीत.

नवी दिल्ली: आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे पुढील महिन्यात ४ एप्रिलपासून आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर होणाऱ्या खर्चात कपात करण्याचा सरकारचा विचार आहे. क्रीडा मंत्रालय खेळाडूंसोबत जाणा-या अधिका-यांच्या पथकास कात्री लावणार असल्याने अधिकारी आणि खेळाडूंचे कुटुंबीय शासकीय खर्चाने विदेशवारी करू शकणार नाहीत.राष्ट्रकुलसाठी २२२ खेळाडू तसेच १०६ अधिका-यांचे पथक पाठविण्याची शिफारस भारतीय आॅलिम्पिक संघटनेने क्रीडा मंत्रालयाकडे केली. यादीला क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी अद्याप मंजुरी दिली नाही. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रानुसार १०६ अधिकाºयांंमध्ये ५७ प्रशिक्षक, १९ मॅनेजर आणि ४१ सपोर्ट स्टाफचा समावेश असून यातील ४१ नावांची समीक्षा होईल. त्यातील २० नावे गळण्याची दाट शक्यता आहे. अंतिम यादी एक - दोन दिवसात निश्चित होईल, मात्र यंदा शासकीय खर्चाने कुणी अधिकारी आणि खेळाडूंचे नातेवाईक विदेशवारी करू शकणार नाहीत, हे ठरले आहे.क्रीडा मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अनेक अधिकारी व नातेवाईक शासकीय खर्चाने प्रवास करायचे. क्रीडा ग्राममध्ये त्यांना प्रवेश नसायचा, त्यामुळे खेळाडूंची ते काय मदत करणार? याशिवाय दिग्गज खेळाडू आपल्या नातेवाईकांना मेंटॉर किंवा मॅनेजर बनवून प्रवास घडवून आणायचे. अशा अनेक तक्रारी मिळाल्यानंतर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. शासकीय खर्चाचा दुरुपयोग होऊ नये व खेळाडूंवर फोकस करता यावा, ही यामागील भूमिका आहे.

टॅग्स :Sportsक्रीडा