शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘शापित गंधर्व’

By admin | Updated: March 23, 2015 01:39 IST

विश्वकप क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीपासून आतापर्यंत उपांत्य फेरीचा मार्ग सहज गाठणाऱ्या न्यूझीलंड संघापुढे यावेळीही हा अडथळा पार करण्याचे आव्हान आहे.

आॅकलंड : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत सुरुवातीपासून आतापर्यंत उपांत्य फेरीचा मार्ग सहज गाठणाऱ्या न्यूझीलंड संघापुढे यावेळीही हा अडथळा पार करण्याचे आव्हान आहे. न्यूझीलंडपुढे उपांत्य फेरीत आजतागायत उपांत्य फेरीपुढे मजल मारण्यात अपयशी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. प्रतिभा असताना यापूर्वी अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरलेल्या न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान रंगणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीनंतर यावेळी एक संघ मात्र अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम करणार आहे, हे मात्र निश्चित. ‘शापित गंधर्व’ संघांदरम्यानच्या मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत कुठला संघ बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे. न्यूझीलंडने विक्रमी सातव्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी सहा स्पर्धांमध्ये त्यांना उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे. पण यावेळी साखळी फेरीत अपराजित राहून त्यांनी अंतिम चारमध्ये प्रवेश मिळविला आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिका संघ ‘चोकर्स’चा शिक्का पुसून काढण्यास प्रयत्नशील आहे. दक्षिण आफ्रिका संघाने चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी तीनवेळा त्यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. यावेळी उभय संघांपैकी एक संघ निश्चितच उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरणार आहे. उपांत्य फेरीत पराभूत होण्याचे दु:ख दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत न्यूझीलंड संघाला अधिक आहे. न्यूझीलंडने १९७५च्या पहिल्या विश्वकप स्पर्धेत अंतिम चारमध्ये स्थान मिळविले होते. पण त्यावेळी त्यांना उपांत्य फेरीतच चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पाच विकेटस्ने पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर चार वर्षांनी १९७९ मध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली, पण त्यावेळी त्यांना यजमान इंग्लंडविरुद्ध ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. न्यूझीलंडला १९८३ व १९८७ मध्ये उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. १९९२ मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे विश्वकप स्पर्धेचे यजमानपद भूषवले. त्यावेळी मार्टिन क्रोच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघाने सुरुवातीपासून चमकदार कामगिरी करीत उपांत्य फेरीत धडक मारली. पण, त्यावेळी त्यांच्या मार्गात पाकिस्तानने अडथळा निर्माण केला. आॅकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत मार्टिन क्रो (९१) व केन रुदरफोर्ड (५०) यांच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने ७ बाद २६१ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानने विजयासाठी आवश्यक धावा ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. पाकिस्तानने प्रथमच अंतिम फेरी गाठली आणि जेतेपदाचा मान मिळविला. २००७ च्या विश्वकप स्पर्धेत भारत व पाकिस्तान पहिल्याच फेरीत गारद झाल्यामुळे न्यूझीलंडला अंतिम चारमध्ये प्रवेश करताना विशेष कष्ट पडले नाही. उपांत्य फेरीत मात्र त्याला श्रीलंकेने रोखले. श्रीलंकेने या लढतीत ८१ धावांनी विजय मिळविला.न्यूझीलंडने २०११ मध्येही उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी केली. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांची वाटचाल श्रीलंका संघाने रोखली. आता न्यूझीलंड संघ सातव्यांदा नशीब बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. दक्षिण आफ्रिका संघाला साखळी फेरीत दोन पराभव स्वीकारावे लागले असले तरी, त्यांनी संघातील उणिवा दूर करीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळविला आहे. दक्षिण आफ्रिका संघ १९९२ मध्ये प्रथमच विश्वकप स्पर्धेत सहभागी झाला होता. तेव्हापासून आजतागायत दक्षिण आफ्रिका संघ तीनदा उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. १९९२ मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघापुढे डकवर्थ लुईस पद्धतीनुसार एका चेंडूवर २१ धावा फटकावण्याचे लक्ष्य होते. इंग्लंडविरुद्ध या लढतीत त्यांना २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर १९९९ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्यांची लढत ’टाय’ झाली. पण सुपरसिक्समध्ये पिछाडीवर असल्यामुळे त्यांचे अंतिम फेरीचे स्वप्न भंगले. २००७ मध्ये त्यांना उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)