शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

उत्सुकता भारताच्या विजयाची

By admin | Updated: October 14, 2015 00:12 IST

कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सलग पराभव स्वीकारणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध

इंदूर : कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालखंडातून वाटचाल करीत असलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सलग पराभव स्वीकारणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे सामन्यात विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या सुरू असलेल्या दौऱ्यात यजमान भारतीय संघाला अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. दोन टी-२० सामने गमावणाऱ्या भारतीय संघाला कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीतही पराभवाला सामोरे जावे लागले. टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या धोनीसाठी सध्याची स्थिती आव्हानात्मक आहे. विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पराभवापासून धोनीसाठी यंदाचे वर्ष विशेष चांगले गेलेले नाही. आयपीएलच्या अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बांगलादेशमध्ये वन-डे मालिका आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी-२० मालिकाही गमावल्यामुळे धोनीच्या सुवर्णमय कारकिर्दीमध्ये काळ्या अध्यायाची नोंद झाली. फलंदाज म्हणूनही तो ‘मॅच फिनिशर’ची भूमिका बजावण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. पहिल्या वन-डे लढतीत त्याच्याकडे छाप सोडण्याची चांगली संधी होती, पण मोक्याच्या क्षणी त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती, पण ‘कॅप्टन कुल’ संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ३० चेंडूंना सामोेरे जाताना ३१ धावा फटकावल्या. त्यात केवळ एका चौकाराचा समावेश आहे. टी-२० विश्वकप स्पर्धेला अधिक कालावधी उरलेला नाही. त्यामुळे धोनीकडे अधिक वेळ नाही. बुधवारच्या लढतीत सर्वांची नजर धोनी व त्याच्या नेतृत्वावर राहणार आहे. भारताची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. सलामीवीर रोहित शर्मा फॉर्मात आहे. रोहितने धर्मशालामध्ये शतकी खेळी केल्यानंतर कानपूरमध्ये दीड शतकी खेळी केली होती. रोहितचा सलामीचा सहकारी शिखर धवनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. शिखर मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे. संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कानपूरमध्ये ६० धावांची खेळी केली. रहाणे कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. विराट कोहलीवरही मोठी खेळी करण्याचे दडपण राहील. सुरेश रैना आणि स्टुअर्ट बिन्नी यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजांचे अपयश धोनीसाठी सर्वांत मोठा चिंतेचा विषय आहे. फॉर्मात असलेला एकमेव गोलंदाज आर. अश्विन दुखापतग्रस्त असल्यामुळे संघात नाही. भुवनेश्वर कुमार व उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवता आलेले नाही. एबी डिव्हिलियर्सने कानपूरमध्ये संघाला ३००चा पल्ला ओलांडून दिला. डिव्हिलियर्सने ७३ चेंडूंना सामोरे जाताना १०४ धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत १०० पेक्षा अधिक धावा बहाल केल्या. अश्विन व लेग स्पिनर अमित मिश्रा यांनी चांगली कामगिरी केली. अश्विनच्या स्थानी संघात अनुभवी फिरकीपटू हरभजनची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करताना दक्षिण आफ्रिका संघ भारतात पहिली वन-डे मालिका जिंकण्यास प्रयत्नशील आहे. मोर्नी मोर्कल व डेल स्टेन यांच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. युवा कागिसो रबादाने टी-२० मालिकेत छाप सोडली असून, कानपूरमध्ये अखेरच्या षटकात अचूक मारा करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. लेग स्पिनर इम्रान ताहिरने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. फलंदाजीचे नेतृत्व डिव्हिलियर्स करीत असून, फाफ डू प्लेसिस फॉर्मात आहेत. जेपी ड्युमिनीने टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली. याव्यतिरिक्त हाशिम अमला, डेव्हिड मिलर, क्विंटन डिकाक, फरहान बेहारदिन यांच्याकडूनही संघाला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. भारताने यापूर्वी या मैदानावर खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवलेला आहे. (वृत्तसंस्था)>>>>>>> सामन्याची वेळ : दु. १.३० पासून>>> रोहितला पहिल्या १० चेंडूंत बाद करा : लँगवेल्टरोहितच्या आक्रमक क्षमतेची कल्पना असलेले दक्षिण आफ्रिका संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक चार्ल्स लँगवेल्ट त्याला रोखण्यासाठी योजना आखण्यात व्यस्त आहेत. दक्षिण आफ्रिका संघ सध्याच्या भारत दौऱ्यात अद्याप अपराजित असला तरी भारतीय फलंदाज रोहित शर्माचा फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. बुधवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीत रोहितला १० चेंडूंमध्ये बाद करण्यास दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्नशील असून, त्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे.होळकर स्टेडियममध्ये बुधवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे लढतीच्या पूर्वसंध्येला बोलताना लँगवेल्ट म्हणाला, ‘रोहित सध्या चांगल्या फॉर्मात आहे. तो भारतीय वातावरणात चांगला खेळतो. त्याला सुरुवातीला करण्यात येणारे १० चेंडू अधिक महत्त्वाचे आहेत. त्याला सुरुवातीच्या १० चेंडूंमध्ये बाद करण्याचा प्रयत्न राहील. २० धावा फटकावल्यानंतर शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहितचा समावेश आहे.’>>>>>>> प्रतिस्पर्धी संघभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), हरभजन सिंग, स्टुअर्ट बिन्नी, शिखर धवन, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, गुरकिरत सिंग आणि अमित मिश्रा.दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डिकाक, फाफ डू प्लेसिस, जेपी ड्युमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहारदिन, ख्रिस मॉरिस, खाया जोंडो, अ‍ॅरोन फांगिसो, इम्रान ताहिर, डेल स्टेन, मोर्नी मोर्कल, केली एबोट, कागिसो रबादा.