सांगली : प्रिमिअर लीगसाठी सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये सुरू असलेल्या सरावावेळी बाऊंसर लागून सांगली जिल्हा संघातील फलंदाज विजय सुभाष वावरे हा गंभीर जखमी झाला. त्याने हेल्मेट न वापरल्याने चेंडू त्याच्या डोक्यावर जोरात आदळला. बेशुद्ध अवस्थेत त्याला मिरजेतील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्यूजची घटना ताजी असतानाच सांगलीत घडलेल्या या घटनेने क्रिकेटपटूंना धक्का बसला आहे. खासदार संजयकाका पाटील यांच्या नावाने येत्या २१ डिसेंबरपासून सांगलीत प्रिमिअर लीग स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या संघांची तसेच त्यातील खेळाडूंची निवड यापूर्वीच झाली आहे. तासगाव संघात विजय वावरेची निवड झाली होती. येथील शिवाजी स्टेडियमवर सकाळी ८ वाजता नेटमध्ये सराव सुरू होता. (प्रतिनिधी)
सांगलीत बाऊंसर लागून क्रिकेटपटू गंभीर जखमी
By admin | Updated: December 15, 2014 03:36 IST