शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटर मोहम्मद शमीला घरात घुसून मारहाण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 09:14 IST

भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करण्यात आली असून त्याला घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला शिवीगाळ करण्यात आली असून त्याला घरात घुसून मारहाणीचा प्रयत्न करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी मोहम्मद शमीनं कोलकातामध्ये चार जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. 
 
टेलिग्राफनं दिलेल्या वृत्तानुसार, चार जणांनी शिवीगाळ केली आणि बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचा आरोप शमीनं केला. याबाबत त्यानं पोलिसात तक्रारही नोंदवली.  घडल्या प्रकाराबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं एका व्यक्तीची ओळख पटवून अन्य तीन जणांनाही ताब्यात घेतले. यातील तीन जणांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. मात्र जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. 
 
शमीनं घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी (15 जुलै ) रात्री कार पार्किंगदरम्यान एका व्यक्तीसोबत त्याचा वाद झाला. यावरुन संबंधित व्यक्तीनं शमीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यानं शमीला अशीही धमकी दिली की, जर गाडीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केलास तर तुला (शमीला) धडा शिकवेन.
 
आणखी बातम्या वाचा
 
दरम्यान, या घटनेनंतर शमीनं त्याच्यासोबत कुटुंबालाही पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.