शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड विश्‍वविजयापासून वंचित

By admin | Updated: February 14, 2015 18:03 IST

क्रिकेटचा शोध लावणारा देश इंग्लंड, पहिला कसोटी खेळणारा देश इंग्लंड, पहिला वनडे खेळणारा देश इंग्लंड, पहिला ट्टेंटी-२0 खेळणारा देश इंग्लंड, पहिल्या तीन विश्‍वचषक स्पर्धेचा यजमान इंग्लंडच...

विश्‍वास चरणकर, कोल्हापूर
क्रिकेटचा शोध लावणारा देश इंग्लंड, पहिला कसोटी खेळणारा देश इंग्लंड, पहिला वनडे खेळणारा देश इंग्लंड, पहिला ट्टेंटी-२0 खेळणारा देश इंग्लंड, पहिल्या तीन विश्‍वचषक स्पर्धेचा यजमान इंग्लंडच असे असताना इंग्लंड अजूनही पहिल्या विश्‍वविजयाच्या शोधात आहे. माईक डेनेसपासून अँड्रय़ू स्ट्रॉस यांना जे जमले नाही तो चमत्कार करण्याची जबाबदारी जन्माने आयरिश असलेल्या इयोन मोर्गनच्या कोवळय़ा खांद्यावर आली आहे. 
विश्‍वचषक स्पर्धेचे सर्वाधिक चार वेळा यजमानपद भूषविण्याचा मान इंग्लंडकडे जातो. १९७५चा पहिला विश्‍वचषक त्यांनी भरविला. पाठोपाठ १९७९ आणि १९८३ असे सलग तीनदा ते यजमान होते. त्यानंतर १९९९ला पुन्हा त्यांना यजमानपदाचा सन्मान मिळाला. पण या चार वेळेला मायदेशात आणि इतर सहावेळेला परदेशात झालेल्या स्पर्धांमध्ये विश्‍वचषक उचलण्याचे भाग्य एकाही कर्णधाराच्या वाट्याला आले नाही. यापैकी तीनवेळा ते अंतिम फेरीत पोहचले, पण विजेतेपदाची हुलकाणीच मिळाली. ही सल गोर्‍या साहेबाच्या मनात काळय़ा काट्याप्रमाणे बोचत आहे.
१९७५च्या विश्‍वचषकात इंग्लंडने सेमीफायनलपर्यंत मजल मारली. तेथे त्यांन ऑस्ट्रेलियाने हरविले. पुढच्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली पण तेथेही वेस्ट इंडीजने त्यांचा स्वप्नभंग केला. १९८३च्या विश्‍वचषकात सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडीजने त्यांची वाट अडविली. इंग्लंडचा सर्वात जास्त जवळचा हुकलेला वर्ल्डकप म्हणजे १९८७ चा रिलायन्स वर्ल्डकप. कोलकात्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने त्यांना केवळ सात धावांनी हरविले होते. १९९२ ला ते पुन्हा अंतिम फेरीत पोहचले पण इम्रान खानच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघाने त्यांना २२ धावांनी हरविले. यानंतर मात्र त्यांना उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाता आले नाहीे. 
 
ईसीबीचे धाडसी निर्णय
च्जे आतापर्यंत झाले नाही ते यावेळी साध्य करायचे याचा चंग इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खूप आधीपासून बांधला आहे. वनडे क्रिकेट हे तरुणांचे क्रिकेट आहे. म्हणून त्यांनी संघातील वयस्कर खेळाडूंना नारळ देण्यास सुरवात केली. २0१५च्या स्कॉडमध्ये पीटरसन बसत नव्हता म्हणून त्यांनी त्याला हटविले. याच्याही पुढे जावून धाडसी निर्णय घेताना त्यांनी कर्णधार अँलेस्टर कुकला संघातून हटविले. 
च्कुक हा पारंपारिक पठडीतील क्रिकेटपटू, आधुनिक क्रिकेटमध्ये षटकागणिक डावपेच बदलावे लागतात, जरा ‘हटके’ विचार करावा लागतो. या कसोट्यांवर कुक कमी पडत होता म्हणून संघाची धुरा २८ वर्षीय इयोन मोर्गनच्या खांदय़ावर दिली. स्वभावाने शांत पण तितकाच धोरणी असलेला डावखुरा मोर्गन मधल्याफळीत फलंदाजी करतो. त्याच्यातील नेतृत्त्व गुण ईसीबीने ओळखले, आणि स्पर्धेपूर्वी दोन महिने त्याला कर्णधार केले. 
 
आतापर्यंत झालेल्या दहाही विश्‍वचषकात इंग्लंड संघाने दहा कर्णधार पाहिले आहेत. एकाही कर्णधाराला विश्‍वचषकात दोनदा नेतृत्त्व करण्याची संधी मिळालेली नाही. कर्णधारांच्या या यादीत माईक डेनेस (१९७५), माईक बेअर्ले (१९७९), बॉब विलिस (१९८३), माईक गॅटिंग (१९८७), ग्रॅहम गुच (१९९२), माईक अँथरटन (१९९६), अँलेक स्टीवर्ट (१९९९), नासेर हुसेन (२00३), मायकेल वॉन (२00७) आणि अँड्रय़ू स्ट्रॉस (२0११) यांचा समावेश आहे.