नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत, विक्रमांचा बादशाह आणि देव म्हणून ख्यातीप्राप्त असणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा शुक्रवारी वाढदिवस. या मास्टर ब्लास्टर फलंदाजाने आज ४३व्या वर्षांत पदार्पण केले. वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर माजी आणि विद्यमान क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला.अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीचा श्रीगणेशा करून नंतर अनेक वर्षे क्रिकेटजगतावर अधिराज्य गाजवणारा सचिन तेंडुलकर नोव्हेंबर २०१३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्ध त्याच्या कारकीर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. निवृत्तीनंतरही हा महान फलंदाज अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा मुख्य मेंटर तेंडुलकर सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी मुंबईतच आहे.(वृत्तसंस्था)
‘क्रिकेट विश्वातील सर्वांत मोठा स्टार’
By admin | Updated: April 25, 2015 09:30 IST